ODI World Cup 2023 IND vs AUS Final: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय डावाची सुरुवात काही खास झाली नाही, पण तरीही रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने वनडेमध्ये एक खास विक्रम केला आहे. ज्यासोबत ही जोडी आता सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या खास क्लबमध्ये सामील झाली आहे.
दरम्यान, रोहित आणि गिल ही जोडी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी जगातील दुसरी जोडी ठरली आहे. यावर्षी रोहित आणि गिलच्या जोडीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 1523 धावा केल्या आहेत.
या यादीत पहिला क्रमांक सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या सलामीच्या जोडीचा आहे, ज्यांनी 1998 मध्ये 1635 धावा केल्या होत्या. आता या यादीत रोहित आणि गिलची जोडी दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
1. सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली (1635 धावा, वर्ष 1998)
2. रोहित शर्मा-शुबमन गिल (1523 धावा, वर्ष 2023)
3. अॅडम गिलख्रिस्ट-मिचेल वाघ (1518 धावा, वर्ष 1999)
4. सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली (1483 धावा, वर्ष 2000)
अंतिम सामन्यात टीम इंडियाची (Team India) जोडी लवकरच तुटली आणि शुभमन गिल अवघ्या 4 धावा करुन स्टार्कच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा झटपट डाव खेळून बाद झाला. रोहितने अंतिम सामन्यात 47 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियालाही सामन्याच्या सुरुवातीलाच तिसरा धक्का बसला आणि श्रेयस अय्यरही अवघ्या 4 धावा करुन बाद झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.