World Cup 2023 Final: ऑस्ट्रेलियन गोलंदाजी चमकली! विश्वविजयासाठी भारताचे कांगारुंना 241 धावांचे लक्ष्य

India vs Australia Final: वर्ल्डकप 2023 फायनलमध्ये भारतीय संघाने विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान ठेवले आहे.
Pat Cummins Rohit Sharma | India vs Australia | World Cup 2023 Final
Pat Cummins Rohit Sharma | India vs Australia | World Cup 2023 FinalICC
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Australia Final, Virat Kohli Fifty Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या. भारताकडून केएल राहुल आणि विराट कोहली यांनी अर्धशतके केली आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झम्पाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान, भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत पहिल्यांदाच सर्वबाद झाला, तसेच 10 पैकी 5 फलंदाज दोन आकडी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. तसेच भारताकडून एकूण 13 चौकार आणि 3 षटकारच मारण्यात आले.

Pat Cummins Rohit Sharma | India vs Australia | World Cup 2023 Final
World Cup 2023: चौथ्यांदा फायनल खेळणार भारतीय संघ! पाहा यंदा कोणाविरुद्ध मिळवले विजय अन् सामन्याचे हिरो

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यामुळे भारताकडून सलामीला शुभमन गिलसह कर्णधार रोहित शर्मा उतरला.

रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती. पण गिलला 5 व्या षटकात मिचेल स्टार्कने गिलला 4 धावांवर माघारी पाठवले. पण त्यानंतर विराट कोहलीने रोहितला चांगली साथ दिली होती. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाली. त्यामुळे भारताने पहिल्या 10 षटकात 70 धावांचा टप्पा सहज पार केला.

विशेष म्हणजे यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या 10 षटकात 60 धावांचा टप्पा पार करण्याची ही भारताची नववी वेळ होती.

दरम्यान, विराट आणि रोहितची जोडी जमलेली असतानाच 10 व्या षटकात रोहितला ग्लेन मॅक्सवेलने बाद केले. ट्रेविस हेडने मागे पळत येत त्याचा शानदार झेल घेतला. त्यामुळे रोहितला 31 चेंडूत 47 धावांची खेळी करून बाद व्हावे लागले.

त्यामुळे विराट आणि रोहित यांची अर्धशतकी भागीदारीही तुटली. रोहितच्या पाठोपाठ पुढच्याच षटकात कर्णधार पॅट कमिन्सने श्रेयस अय्यरला 4 धावांवर बाद केले.

Pat Cummins Rohit Sharma | India vs Australia | World Cup 2023 Final
World Cup 2023: ऑस्ट्रेलिया आठव्यांदा फायनलमध्ये! पाहा यंदा कोणाविरुद्ध मिळवले विजय अन् सामन्याचे हिरो

यानंतर मात्र भारताची धावगती मंदावली. विराट आणि केएल राहुल यांना अत्यंत धीम्यागतीने फलंदाजी करून डाव पुढे न्यावा लागला 11 ते 20 षटकात अवघ्या 35 धावा आल्या. त्यानंतरही हे दोघे अर्धशतकी भागीदारी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत होते.

मात्र, 29 व्या षटकात कमिन्सने विराटला त्रिफळाचीत करत भारताला मोठा धक्का दिला. विराटने 63 चेंडूत 4 चौकारांसह 54 धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर केएल राहुलला रविंद्र जडेजाने साथ देण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही ऑस्ट्रेलियन गोलंदाज मोठा फटका मारण्याची संधी देत नव्हते. जडेजाला 22 चेंडूत 9 धावाच करता आल्या. त्याला जोश हेजलवूडने माघारी धाडले.

दरम्यान केएल राहुलने अर्धशतक करत सर्वांना दिलासा दिला होता. मात्र, त्याचाही अडथळा मिचेल स्टार्कने दूर केला. त्याने केएल राहुलला 66 धावांवर यष्टीरक्षक जोश इंग्लिसकडे झेल देण्यास भाग पाडले. राहुलला 107 चेंडूत ही खेळी करताना अवघा एकच चौकार मारला.

त्यानंतर मात्र, अखेरच्या 9 षटकात भारताने खालच्या फळीतील फलंदाजांच्या झटपट विकेट गमावल्या. सूर्यकुमार यादवलाही खास काही करता आले नाही. तो 18 धावांवर बाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com