Rohit Sharma: '...अशी पागलपंती आम्ही करत नाही', मिडल ऑर्डरबद्दल बोलताना रोहितची गजब प्रतिक्रिया

India Team: आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर मधल्या फळीबद्दल रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

We don't do that PagalPanti says Rohit Sharma :

वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरु होण्यासाठी केवळ 2 महिन्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. असे असले तरी अद्याप भारतीय संघाला मधल्या फळीतील फलंदाजीची चिंता सतावत आहे. याबद्दल भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

सोमवारी बीसीसीआयने आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की फलंदाजी क्रमवारी बदलताना लवचिकता हवी.

Rohit Sharma
Asia Cup 2023 India Squad: भारतीय संघाची घोषणा! तिलकला संधी, तर श्रेयस-केएल राहुलचे पुनरागमन

रोहित मधल्या फळीबद्दल म्हणाला, 'मी तुम्हाला समजावतो. लवचिकता गरजेची असते, पण याचा अर्थ असा नाही की सलामीवीराला 7 व्या क्रमांकावर पाठवावे किंवा हार्दिक पंड्याला सलामीला खेळवावे. अखेरच्या 4-5 वर्षात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळला आहे.'

'नवीन खेळाडू चौथ्या - पाचव्या क्रमांकवर खेळले आहे, त्यांच्यात लवचिकता गरजेची असते, अगदी माझ्या कारकिर्दीतही असे झाले आहे. आम्ही सर्वांनीच अशी लवचिकता दाखवली आहेत. तशा लवचिकतेबद्दल मी बोलत आहे. मी सलामीवीराला खाली पाठवत नाही. अशी पागलपंती आम्ही नाही करत.'

दरम्यान, चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीबद्दलच्या प्रश्नाबद्दल रोहित हसून म्हणाला, 'आमच्याकडे असे खेळाडू आहेत, जे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. काही आव्हाने आहेत, खेळाडूंना दबावाखालीही टाकले आहे.'

'दुर्दैवाने दुखापतीमुळे आम्हाला दुसऱ्या खेळाडूंनाही संधी द्यावी लागली. आम्ही अक्षर पटेललाही डावखुरा फलंदाजी म्हणून वापरून पाहिले, की जेणेकरून तो जावून फटकेबाजी करेल.'

Rohit Sharma
Asia Cup 2023: चहलला भारतीय संघात जागा का नाही? कॅप्टन रोहित म्हणतोय, 'दरवाजे बंद...'

दरम्यान, आशिया चषकासाठी केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे भारतीय संघात दुखापतीनंतर पुनरागमन झाले आहे. त्यामुळे हे दोघेही मधल्या फळीत खेळण्याची शक्यता आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

राखीव खेळाडू - संजू सॅमसन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com