U19 Asia Cup: खडूस मुंबईकर बांगलादेशचा कोच बनला आणि आशिया कप जिंकून भाव खाऊन गेला

Wasim Jaffer: बांगलादेशला पहिल्यांदाच 19 वर्षांखालील आशिया चषक जिंकून देण्यात भारताच्या दिग्गज क्रिकेटरचे मोलाचे योगदान राहिले.
Wasim Jaffer | U19 Bangladesh Team | U19 Asia Cup
Wasim Jaffer | U19 Bangladesh Team | U19 Asia CupX/ACCMedia1 and WasimJaffer14
Published on
Updated on

Wasim Jaffer congratulate U19 Bangladesh team for winning U19 Asia Cup 2023:

बांगलादेशच्या युवा क्रिकेट संघाने रविवारी इतिहास रचला. रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 19 वर्षांखालील आशिया चषकाचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता.

या अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील बांगलादेशच्या संघाने संयुक्त अरब अमिरातीला (UAE) 195 धावांनी पराभूत केले आणि आशिया चषकावर नाव कोरले.

दरम्यान, बांगलादेशच्या या यशात एका भारतीय क्रिकेटपटूचाही महत्त्वाचा वाटा राहिला. हा भारतीय खेळाडू म्हणजे वासिम जाफर. मुंबईच्या वसिम जाफरचे नाव भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंमध्ये घेतले जाते. तो रणजी ट्रॉफीमध्ये 12 हजारांहून अधिक धावा करणाराही एकमेव खेळाडू आहे.

परंतु, सध्या जाफर 19 वर्षांखालील बांगलादेश संघाचा फलंदाजी मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. त्याने काही वर्षांपूर्वीच खेळाडू म्हणून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता तो प्रशिक्षण क्षेत्रात सक्रिय आहे.

Wasim Jaffer | U19 Bangladesh Team | U19 Asia Cup
U19 Asia Cup: बांगलादेशने पहिल्यांदाच उंचावली ट्रॉफी, फायनलमध्ये युएईला चारली धूळ

दरम्यान, 2022 पासून जाफर बांगलादेशच्या 19 वर्षांखालील संघाचा फलंदाजी मार्गदर्शक म्हणून काम पाहात आहे. त्याने बांगलादेशच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी दोन वर्षांचा करार केला आहे.

त्यामुळे जाफर देखील दुबईत झालेल्या 19 वर्षांखालील आशिया चषकादरम्यान बांगलादेश संघाबरोबर होता. त्याने विजेतेपद मिळवल्यानंतर बांगलादेश संघाचे कौतुकही केले आहे.

त्याने ट्वीट करत लिहिले की 'बांगलादेशसाठी पहिलेच 19 वर्षांखालील आशिया चषक विजेतेपद! आम्ही स्वप्न पाहिले आणि खेळाडूंनी ते आज पूर्ण केले. यासाठी मी खूप आनंदी असून अभिमान वाटत आहे. चॅम्पियन्स ऑफ आशिया.' त्याचे हे ट्वीटही सध्या व्हायरल होत आहे.

Wasim Jaffer | U19 Bangladesh Team | U19 Asia Cup
Wasim Jaffer: तीन स्पिनर, एक ऑलराउंडर अन् पहिल्यांदा... चंद्राचा पृष्ठभाग पाहून वसीम जाफरने बनवला पिच रिपोर्ट

वासिम जाफरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

जाफरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून 31 कसोटी सामने खेळले असून 5 शतके आणि 11 अर्धशतकांसह 34.10 च्या सरासरीने 1944 धावा केल्या आहेत. तसेच तो 2 वनडे सामनेही खेळला असून यात त्याने 10 धावाच केल्या. दरम्यान, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीपेक्षा त्याच देशांतर्गत क्रिकेटमधील कारकिर्दी अधिक गाजली.

निवृत्त झाल्यानंतर त्याने ओडिसा संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून, तसेच आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहिले. त्यानंतर तो 18 वर्षांखालील बांगलादेश संघात मार्गदर्शक म्हणून सामील झाला.

बांगलादेशने जिंकला सामना

दरम्यान, रविवारी झालेल्या अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 282 धावा केल्या होत्या. त्यानंतर 283 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युएईचा संघ 24.5 षटकात 87 धावांवरच सर्वबाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com