Babar Azam Video Viral: बाबरनं डोक्यात बाटलीच हाणली असती... काय आहे हे 'झिम्बाबर झिम्बाबर' प्रकरण?

Pakistan Super League: पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2024 मध्ये खेळत आहे.
Babar Azam Video Viral
Babar Azam Video ViralDainiK Gomantak
Published on
Updated on

Pakistan Super League: पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2024 मध्ये खेळत आहे. पेशावर झल्मीची धुरा बाबरच्या हातात आहे. पीएसएल सामन्यादरम्यान काही प्रेक्षकांनी बाबरला 'झिम्बाबर' म्हणत चिडवले, त्यानंतर बाबर चांगलाच संतापलेला दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक क्रिकेट चाहते बाबरला ट्रोल करण्यासाठी 'झिम्बाबर' म्हणतात.

दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ पेशावर झल्मी विरुद्ध मुलतान सुलतान सामन्याचा आहे, जो 23 फेब्रुवारीला खेळला गेला होता. बाबर टेक्निकल स्टाफसोबत बसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्याचदरम्यान, प्रेक्षकांचा एक समूह 'झिम्बाबर झिम्बाबर' म्हणून ओरडायला लागतो. त्यानंतर बाबर त्यांच्या दिशेने पाहतो आणि आणि पाण्याची बाटली मारण्याची धमकी देतो. विशेष म्हणजे, तो त्यांना हाताने जवळ येण्याचा इशाराही करतो. मात्र, बाबरच्या धमकीचा प्रेक्षकांवर फारसा परिणाम झाला नाही आणि ते 'झिम्बाबर-झिम्बाबर' म्हणतच राहिले.

Babar Azam Video Viral
Babar Azam: बाबर आझमची शानदार कामगिरी, ख्रिस गेलचा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड; किंग कोहलीला सोडले मागे

बाबरला 'झिम्बाबर' काय म्हणतात?

दरम्यान, बाबरने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याची तुलना विराट कोहलीसारख्या फलंदाजाशी केली जाते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत पाकिस्तानसाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये बाबर फ्लॉप ठरला आणि त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. ट्रोलर्सचे म्हणणे आहे की, बाबरची बॅट फक्त झिम्बाब्वेविरुद्ध तळपते. या कारणावरुन त्याला 'झिम्बाबर' म्हणून चिडवण्यात येते. बाबरने झिम्बाब्वेविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये 18 सामने खेळले आहेत आणि 57.75 च्या सरासरीने 693 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com