मार्गदर्शक बदलताच विजयाला गवसणी, एटीके मोहन बागान संघ विजयी

फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली एटीके मोहन बागानची नॉर्थईस्टवर मात
ATK Mohun Bagan

ATK Mohun Bagan

Dainik gomantak

पणजी : एटीके मोहन बागान संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात सलग चार सामने विजयाविना होता, मात्र नवे प्रशिक्षक नियुक्त होताच त्यांनी विजयास गवसणी घालताना कमजोर बचावाच्या नॉर्थईस्ट युनायटेडवर मंगळवारी 3-2 फरकाने मात केली.

नवे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली एटीके मोहन बागान संघ फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर नव्या आव्हानासाठी उतरला व यशस्वी ठरला. एटीके मोहन बागानसाठी ह्यूगो बुमूस याने दोन, तर लिस्टन कुलासोने एक गोल केला. नॉर्थईस्ट युनायटेडतर्फे सुहेर वाडाक्केपीडिका व `सुपर सब` माशूर शेरीफ यांनी प्रत्येकी एक गोल केला.

<div class="paragraphs"><p>ATK Mohun Bagan</p></div>
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, 'या' तुफानी गोलंदाजाने मालिकेतून घेतली माघार !

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास एटीके मोहन बागानला धक्का बसला. हेडिंगवर यशस्वी ठरलेल्या सुहेर वाडाक्केपीडिका याने सामन्याच्या 104 व्या सेकंदास केलेल्या वेगवान गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने आघाडी घेतली. सुहेरचा हा मोसमातील तिसरा गोल ठरला. पूर्वार्धात 45+1व्या गोमंतकीय स्ट्रायकर लिस्टन कुलासोच्या शानदार हेडिंगमुळे एटीके मोहन बागानने विश्रांतीच्या ठोक्यास 1-1 गोलबरोबरी साधली. लिस्टनचा हा मोसमातील चौथा गोल ठरला. स्पर्धेच्या आठव्या मोसमात सर्वाधिक गोल करणाऱ्या भारतीयांत लिस्टन आता अव्वल ठरला आहे.

उत्तरार्धात फ्रेंच फुटबॉलपटू (Football) ह्यूगो बुमूस याने दोन गोल केल्याने एटीके मोहन बागानला 3-1 अशी आघाडी मिळाली. बुमूसने अनुक्रमे 53 व 76 व्या मिनिटास नॉर्थईस्टचा गोलरक्षक मिर्शाद मिचू याला असाह्य ठरविले. बुमूसने आता मोसमात पाच गोल केले असून सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या मुंबई सिटीचा इगोर आंगुलो व हैदराबादचा बार्थोलोम्यू ओगबेचे यांना गाठले. सामन्याच्या 87व्या मिनिटास बदली खेळाडू माशूर शेरीफ याने आयएसएल स्पर्धेतील पहिला गोल नोंदवत नॉर्थईस्ट युनायटेडची पिछाडी 2-3 अशी कमी केली.

<div class="paragraphs"><p>ATK Mohun Bagan</p></div>
एफसी गोवा प्रशिक्षकपदी डेरिक परेरा

विजयासह प्रगती

एटीके मोहन बागानने आयएसएलच्या आठव्या मोसमात विजयासह गुणतक्त्यात प्रगती साधली. त्यांचा हा सात लढतीतील तिसरा विजय असून 11 गुण झाले आहेत. हैदराबाद (Hyderabad) व चेन्नईयीनचेही (Chennai) तेवढेच गुण आहेत, मात्र गोलसरासरीत कोलकात्याच्या संघाला पाचवा क्रमांक मिळाला. नॉर्थईस्ट युनायटेडला पाचवा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे आठ सामन्यानंतर ते सात गुणांसह नवव्या स्थानी कायम राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com