क्रिकेटमध्ये गोव्याची शरणागती कायम, छत्तीसगडविरुद्ध फॉलोऑनची नामुष्की

छत्तीसगडविरुद्ध फॉलोऑनची नामुष्की आली असून संघ पराभवाच्या छायेत आहे.
Goa cricket team

Goa cricket team

Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट (Cricket) स्पर्धेतील गोव्याची प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची शरणागती मंगळवारीही कायम राहिली, त्यामुळे त्यांच्यावर छत्तीसगडविरुद्ध फॉलोऑनची नामुष्की आली असून संघ पराभवाच्या छायेत आहे.

सूरत येथील लालभाई कॉन्ट्रेक्टर स्टेडियमवर सुरू असलेल्या चार दिवसीय सामन्याच्या दुसऱ्या दिवशी छत्तीसगडने कालच्या 9 बाद 307 वरून पहिल्या डावात 369 धावा केल्या. दीपक सिंग (नाबाद 41) व वासुदेव बारेथ (25) यांनी शेवटच्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी करून गोव्याला चांगलेच सतावले.

<div class="paragraphs"><p>Goa cricket team</p></div>
एफसी गोवा प्रशिक्षकपदी डेरिक परेरा

सलामीच्या वीर यादव (68) याच्या अर्धशतकानंतरही गोव्याचा पहिला डाव 172 धावांत आटोपला. गोव्याने अखेरच्या सहा विकेट्स फक्त 27 धावांत गमावल्या. दीपक यादव याने 7 गडी बाद केल्यामुळे छत्तीसगडला 197 धावांची मोठी आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही गोव्याची (goa) खराब फलंदाजी कायम राहिली. 2 बाद 10 धावा अशी स्थिती असलेला गोव्याचा संघ अजून 187 धावांनी मागे आहे.

<div class="paragraphs"><p>Goa cricket team</p></div>
मार्गदर्शक बदलताच विजयाला गवसणी, एटीके मोहन बागान संघ विजयी

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड, (Chhattisgarh) पहिला डाव : 68.2 षटकांत सर्वबाद 369 (दीपक सिंग नाबाद 41, वासुदेव बारेथ 25, श्रेयस उसगावकर 1-13).

गोवा, पहिला डाव : 68.2 षटकांत सर्वबाद 172 (वीर यादव 68, इझान शेख 21, आर्यन नार्वेकर 4, जुनेद शेख 10, कौशल हट्टंगडी 15, आयुष वेर्लेकर 24, उदित यादव 4, दीप कसवणकर 2, सुजय नाईक 1, श्रेयस उसगावकर नाबाद 3, फरदीन खान 0, दीपक सिंग 20.2-11-44-3, दीपक यादव 24-6-47-7) व दुसरा डाव : 5 षटकांत 2 बाद 10 (वीर यादव 4, इझान शेख नाबाद 2, आर्यन नार्वेकर 1, जुनेद सय्यद नाबाद 1, मयांक यादव 7-1).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com