Ishan Kishan's Double Century: ईशानच्या द्विशतकानंतर विराटने केला भांगडा; व्हिडिओ झाला व्हायरल...

भर मैदानात किंग कोहलीचे ईशानसह अनोखे सेलिब्रेशन
Ishan Kishan Double Century
Ishan Kishan Double Century Dainik Gomantak
Published on
Updated on

Ishan Kishan's Double Century Against Bangladesh: बांग्लादेशविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील (India vs Bangladesh ODI series) तिसऱ्या आणि अखेरच्या सामना लक्षात राहिल तो ईशान किशानच्या द्विशतकाने. यामुळे ईशान किशनचे सर्वत्र कौतूक होत आहे. पण, जेव्हा ईशानने द्विशतक झळकावले तेव्हा विराट कोहली याने मैदानात केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

(Virat Kohli's Dance Video)

Ishan Kishan Double Century
FIFA Viral Video: 'फिफा'मध्ये अमेरिकन पत्रकाराचा रहस्यमय मृत्यू; भावाने ढसाढसा रडत कतार सरकारवर केले गंभीर आरोप

या सेलिब्रेशनचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. विराटने ईशानच्या द्विशतकानंतर मैदानात चक्क भांगडा डान्स केला.

या सामन्याच्या 35 व्या ओव्हरमध्ये मुस्तफिजूर रेहमान याच्या चेंडुवर एक धाव घेतली आणि संपुर्ण स्टेडियमने ईशान किशानला स्टँडिंग ओव्हेशन दिले. ईशाननेही हेलमेट काढून जोशात द्विशतकाचा जल्लोष केला. ईशान फटकेबाजी करत जेव्हा द्विशतकाजवळ पोहचला तेव्हा दुसऱ्या बाजुला विराट ईशानच्या द्विशतकाची वाट पाहत होता. आणि जेव्हा ईशानने एक धाव घेत 200 धावा पुर्ण केल्या, त्यानंतर विराट कोहलीला स्वतःचा आनंद लपवता आला नाही. विराट अत्यानंदाने मैदानातच नाचू लागला. त्याने ईशानसोबत चक्क भांगडा डान्स केला.

Ishan Kishan Double Century
South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या 'या' स्टार महिला खेळाडूने अचानक केली निवृत्तीची घोषणा!

ईशानच्या शतकाचा हा जल्लोष बांग्लादेशी संघही पाहत राहिला. ईशानने 131 चेंडुत 210 धावांची खेळी केली. यात त्याने तब्बल 24 चौकार आणि 10 षटकारांची आतषबाजी केली. इशानने सर्वाधिक वेगाने द्विशतक झळकविण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. त्याने 126 चेंडुत द्विशतक साजरे केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com