South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या 'या' स्टार महिला खेळाडूने अचानक केली निवृत्तीची घोषणा!

Mignon du Preez Retirement: मिग्नॉन डू प्रीझने तब्बल16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर शुक्रवारी T20 सह आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.
Mignon du Preez
Mignon du PreezDainik Gomantak
Published on
Updated on

South African Player Mignon du Preez: दक्षिण आफ्रिकेची स्टार महिला फलंदाज मिग्नॉन डू प्रीझने तब्बल16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर शुक्रवारी T20 सह आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. मिग्नॉन, दक्षिण आफ्रिकेची सर्वाधिक कॅप असलेली महिला क्रिकेटपटू आहे. न्यूझीलंडमध्ये 2022 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर, तिने वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली होती.

निवृत्तीनंतर दिले हे वक्तव्य

मिग्नॉन डु प्रीझ म्हणाल की, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) 15 हून अधिक वर्षे चांगली राहिली आहेत. तुम्हाला जे आवडते त्यापासून दूर जाणे हा कधीही सोपा निर्णय नाही. परंतु मला माहित आहे की, माझी निवृत्ती जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे.'

Mignon du Preez
South Korea vs Portugal: रोनाल्डोच्या पोर्तुगालला धक्का देत दक्षिण कोरिया 'राऊंड ऑफ 16'मध्ये दाखल

वयाच्या 17 व्या वर्षी पदार्पण

17 व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत (South Africa) वनडे पदार्पण केल्यानंतर सात महिन्यांनी ऑगस्ट 2007 मध्ये तिने T20 संघात प्रवेश केला होता. निवृत्तीच्या वेळी, 33 वर्षीय मिग्नॉनने 114 टी-20 सामने खेळले आहेत, तिने 20.98 च्या सरासरीने 1,805 धावा केल्या, ज्यात 2014 मध्ये सोलिहुल येथे आयर्लंडविरुद्ध सात अर्धशतके आणि 69 च्या उच्च स्कोअरचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com