IND vs NEP: स्टेडियममध्ये नेपाळी गाणं वाजलं अन् विराटही लागला थिरकायला, पाहा व्हिडिओ

Virat Kohli Dance: सोमवारी भारत-नेपाळ यांच्यातील आशिया चषकाच्या सामन्यादरम्यान विराट नेपाळी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli dance on Nepalese song during the Asia Cup 2023 Match:

भारत विरुद्ध नेपाळ संघात सोमवारी आशिया चषक 2023 स्पर्धेतील साखळी फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 10 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान एका क्षणी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसला होता.

कँडीतील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की नेपाळकडून असिफ शेख आणि भीम शार्की फलंदाजी करत आहेत.

यावेळी स्टेडियममध्ये नेपाळी गाणे वाजत आहे. त्यावर भारताकडून क्षेत्ररक्षण करणारा विराट काही डान्स स्टेप्स करत आहे. त्याचा हा नेपाळी गाण्यावर थिरकतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Virat Kohli
IND vs NEP: जडेजाच्या गोलंदाजीनं भारताचं कमबॅक, तरी नवख्या नेपाळनं ठेवलं 231 धावांचं आव्हान

दरम्यान, या सामन्यात दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराटकडून मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर असिफचा झेल सुटला होता. त्याचा फायदा घेत असिफने अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर 30 व्या षटकात सिराजच्याच गोलंदाजीवर विराटने असिफचा शानदार एकहाती झेल घेतला.

तथापि, या सामन्यात भारताकडून ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले होते. भारताकडून विराटच नाही, तर श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्याकडूनही झेल सुटले होते.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नेपाळ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकात सर्वबाद 230 धावा केल्या.

Virat Kohli
IND vs NEP: रोहित-शुभमन जोडीची नेपाळविरुद्ध विक्रमी भागीदारी, सेहवाग-गंभीरला टाकले मागे

नेपाळकडून असिफ शेखने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सोमपाल कामीने 48 धावांची खेळी केली, तर भुरटेलने 38 धावांची खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे भारतासमोर डकवर्थ लुइस नियमानुसार 23 षटकात 145 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. हे आव्हान भारताने 20.1 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले आणि सामना जिंकला.

याबरोबरच भारताने सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित केला. भारताकडून रोहित शर्माने नाबाद 74 धावा आणि शुभमन गिलने नाबाद 67 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com