IND vs NEP: रोहित-शुभमन जोडीची नेपाळविरुद्ध विक्रमी भागीदारी, सेहवाग-गंभीरला टाकले मागे

Asia Cup 2023: आशिया चषकात नेपाळविरुद्ध भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिने नाबाद शतकी भागीदारी करत खास विक्रम केला.
Rohit Sharma - Shubman Gill
Rohit Sharma - Shubman GillDainik Gomantak

Asia Cup 2023 India vs Nepal Rohit Sharma and Shubman Gill pair surpasses Virender Sehwag Gautam Gambhir record :

सोमवारी भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेत नेपाळला 10 विकेट्सने पराभूत केले. भारताच्या या विजयात सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके झळकावत मोलाचा वाटा उचलला. याबरोबर दोघांनी एक खास विक्रमही केला आहे.

कँडीतील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 230 धावा केल्या होत्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर विजयासाठी 23 षटकात 145 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.

या आव्हानाचा पाठलाग भारताने 20.1 षटकात एकही विकेट न गमावता 147 धावा करत सहज पूर्ण केला. भारताकडून कर्णधार रोहितने 59 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. तसेच शुभमन गिलने 62 चेंडूत 67 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला.

Rohit Sharma - Shubman Gill
IND vs NEP: नेपाळविरुद्ध टीम इंडियाने सोडलेले कॅच पाहून फॅन्सला आठवला 'लगान', भन्नाट मीम्स व्हायरल

दरम्यान, रोहित आणि गिल यांच्यात झालेली नाबाद 147 धावांची भागीदारी विक्रमी ठरली. वनडे स्वरुपात खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकात भारतासाठी केलेली ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली. त्यामुळे त्यांनी विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्या 127 धावांच्या भागीदारीच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

वनडे स्वरुपात खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकात भारतासाठी सर्वोच्च सलामी भागीदारी करणाऱ्या जोड्यांमध्ये अव्वल क्रमांकावर रोहित शर्मा आणि शिखर धवन आहेत. त्यांनी 2018 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दुबई येथे झालेल्या सामन्यात 210 धावांची सलामी भागीदारी केली होती. तसेच दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि मनोज प्रभाकर आहेत. यांच्या जोडीने 1995 ला झालेल्या आशिया चषकात श्रीलंकेविरुद्ध शारजामध्ये सलामीला 161 धावांची भागीदारी केली होती.

दरम्यान सेहवाग आणि गंभीर यांनी 127 धावांची सलामी भागीदारी 2008 च्या आशिया चषकात कराचीला हाँग काँगविरुद्ध झालेल्या सामन्यात केली होती.

Rohit Sharma - Shubman Gill
IND vs NEP: कर्णधार रोहितला हिटमॅननेच अफलातून कॅच घेत पाठवलं तंबुत, पाहा Video

रोहितचा विक्रम

रोहितनेही त्याच्या खेळीदरम्यान 5 षटकार मारल्याने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. वनडे स्वरुपात खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुरेश रैना आणि विरेंद्र सेहवागची रोहितने बरोबरी केली आहे.

रैनाने 2008 मध्ये कराचीला झालेल्या हाँग काँग विरुद्धच्या सामन्यात 5 षटकार मारले होते. तसेच विरेंद्र सेहवागने 2008 मध्येच कराचीला पाकिस्तानविरुद्ध खेळताना 5 षटकार मारले होते.

या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या सौरव गांगुलीने 2000 साली ढाका येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 7 षटकार मारले होते. तसेच दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी असून त्याने 2008 हाँग काँगविरुद्धच 6 षटकार मारले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com