IND vs NEP: जडेजाच्या गोलंदाजीनं भारताचं कमबॅक, तरी नवख्या नेपाळनं ठेवलं 231 धावांचं आव्हान

Asia Cup 2023: नेपाळ संघाने भारतासमोर विजयासाठी 231 धावांचे आव्हान ठेवले आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Asia Cup 2023 India need 231 runs against Nepal: सोमवारी भारत विरुद्ध नेपाळ संघात आशिया चषकाच्या साखळी फेरीतील सामना सुरु आहे. कँडीतील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 231 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नेपाळकडून कुशल भुरटेल आणि असिफ शेख सलामीला फलंदाजीला उतरले.

Team India
IND vs NEP: टीम इंडियाची ढिसाळ फिल्डिंग! पहिल्या 5 ओव्हरमध्येच नेपाळच्या सलामीवीरांचे सोडले 3 कॅच

नेपाळचे सलामीवीर खेळपट्टीवर स्थिर होण्याचा प्रयत्न करत असतानाच भारताकडून ढिसाळ पाहायला मिळाली. पहिल्या 5 षटकातच श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि इशान किशन यांनी सोपे झेल घेतले.

त्यामुळे नेपाळच्या सलामीवीरांनी फायदा घेत चांगली सुरुवात केली. त्यांनी सलामीला अर्धशतकी भागीदारी केली. पण 10 व्या षटकात शार्दुल ठाकूरने भुरटेलला बाद करत भारताचा पहिले यश मिळवून दिले.

भुरटेलने 38 धावांची खेळी केली. तसेच भुलटेल आणि असिफ यांच्यात ६५ धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर रोहित पौडवाल (5), भीम शार्की (7) आणि कुशल मल्ला (2) या तिघांना रविंद्र जडेजाने झटपट बाद केले आणि भारताला पुनरागमन करून दिले.

Team India
IND vs NEP सामन्यावरही पडणार पावसाचे पाणी? मॅच रद्द झाल्यास कसं असणार सुपर-4 चे समीकरण

मात्र, त्यानंतर गुलसन झा, दिपेंद्र सिंग ऐरे आणि सोमपाल कामी यांनी छोटेखानी खेळी करत डाव पुढे नेला. दरम्यान सोमपालचे अर्धशतक 2 धावांनी थोडक्यात हुकले. पण त्याच्या 48 धावांच्या खेळीमुळे नेपाळने 190 धावांचा टप्पा पार केला.

दरम्यान, सोमपाल बाद झाल्यानंतर नेपाळच्या तळातल्या फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या. त्यामुळे नेपाळचा संघ 48.2 षटकात 230 धावांवर सर्वबाद झाला.

भारताकडून रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, तसेच मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com