Happy B'day Mahi Bhai: विराट कोहली अन् सुरेश रैनाने 'बिग ब्रदर' एमएस धोनीसाठी केली भावनिक पोस्ट

विराट कोहलीला माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल किती प्रेम आणि आदर आहे हे सर्वांना माहीतच आहे.
MS Dhoni
MS Dhoni Dainik Gomantak

विराट कोहलीला (Virat Kohli) माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल किती प्रेम आणि आदर आहे हे सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे धोनीच्या वाढदिवसानिमित्त विराट कोहलीने खास पद्धतीने भावना व्यक्त करणे हे स्वभाविकच आहे. बुधवारी धोनी 41 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि धोनीसाठी कोहलीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. (Virat Kohli and Suresh Raina made an emotional post for Big Brother MS Dhoni)

MS Dhoni
IND vs WI 2022: 'मला जमेत धरु नका' विराट कोहलीची निवड समीतीकडे विनंती!

पोस्टसोबत कोहलीने लिहिले की, धोनी सर्वांपेक्षा वेगळा नेता आहे आणि तो त्याच्यासाठी मोठ्या भावासारखा आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली कोहली हा आजचा खेळाडू बनला दोघांमध्ये वेळोवेळी एकमेकांबद्दल आदर आहे.

आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये कोहलीने लिहिले की, “सर्व नेत्यांमध्ये वेगळे. तुम्ही भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद तू माझ्यासाठी मोठ्या भावासारखा झालास नेहमी प्रेम आणि आदर याशिवाय काहीही नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा कर्णधार."

धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये निवृत्ती जाहीर केली तेव्हाही कोहलीने सोशल मीडियावर एक अतिशय भावनिक पोस्ट टाकली होती आणि त्याला कायमचा कर्णधार देखील म्हटले होते. कोहली आणि धोनी हे विकेट्स दरम्यान सर्वात वेगवान धावणारे खेळाडू आहेत. त्यांची भागीदारी पाहूनच त्यांच्यातील मैत्रीचा अंदाज आपल्याया येऊ शकतो.

एमएस धोनीसोबत सुरेश रैनानेही त्याच दिवशी निवृत्ती जाहीर केली होती. तेव्हापासून रैना धोनीचा चांगला मित्र असल्याचे बोलले जाते. या दोन खेळाडूंनी भारतीय संघाच्या चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक भागीदारीही केल्या आहेत.

MS Dhoni
माही लंडनमध्ये घेतोय टेनिसचा आनंद, विम्बल्डनने 'स्पेशल कॅप्शन'सह केला फोटो शेअर

सुरेश रैनाने (Suresh Raina) त्याच्या इंस्टाग्रामवर धोनीसाठी खास संदेश देत एक व्हिडिओही पोस्ट केला ज्यामध्ये रैनाने धोनीला त्याचा मोठा भाऊ आणि मेंटॉर असे म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू त्यांच्या बंधुभाव आणि मैत्रीसाठी कायमच ओळखले जातात. या दोन स्टार फलंदाजांचे एमएस धोनीसोबतचे नाते याचा सर्वात मोठा साक्षीदारच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com