माही लंडनमध्ये घेतोय टेनिसचा आनंद, विम्बल्डनने 'स्पेशल कॅप्शन'सह केला फोटो शेअर

महेंद्रसिंग धोनी आणि सुनील गावस्कर लंडनमध्ये टेनिसचा आनंद लुटताना दिसत आहेत.
MS Dhoni in London | MS Dhoni Latest Photo
MS Dhoni in London | MS Dhoni Latest PhotoTwitter/@Wimbledon
Published on
Updated on

आज भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस आहे. क्रिकेटच्या मैदानावर अतिशय कूल दिसणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. या यष्टीरक्षक फलंदाजाची गणना भारताच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये केली जाते. खरं तर, महेंद्रसिंग धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली ICC 50 ओव्हर वर्ल्ड कप, T20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसह सर्व ICC ट्रॉफी जिंकल्या आहेत. भारतासाठी ही कामगिरी करणारा तो एकमेव कर्णधार आहे. (MS Dhoni Birthday)

MS Dhoni in London | MS Dhoni Latest Photo
जो रूटने मोडला सुनील गावस्करांचा मोठा विक्रम, आता सचिनला मागे टाकण्याच्या तयारीत

विम्बल्डन आणि CSK ने शेअर केला फोटो

दरम्यान, बर्थडे बॉय धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वास्तविक, हा फोटो लंडनचा असून विम्बल्डनने खास कॅप्शनसह शेअर केला आहे. ज्यामध्ये भारताचा माजी कर्णधार लंडनमध्ये विम्बल्डन (टेनिस) पाहत आहे. विम्बल्डनने एमएस धोनीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये विम्बल्डनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'भारतीय आयकॉन लंडनमध्ये विम्बल्डन पाहत आहेत.' त्याचवेळी आयपीएलचा 4 वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुनील गावस्कर यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोन्ही भारतीय दिग्गज लंडनमध्ये विम्बल्डन पाहताना दिसत आहेत.

MS Dhoni in London | MS Dhoni Latest Photo
MS Dhoni 41st Birthday: माहीच्या आयुष्यातील 41 रंजक गोष्टी वाचा एका क्लिकवर

धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्याच वेळी, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने 2011 चा विश्वचषक, 2013 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. याशिवाय धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये अव्वल स्थानावर होता. महेंद्रसिंग धोनीने 72 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले, 41 सामने जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com