भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारत यजमान इंग्लंडसोबत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार असून त्यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. भारत-इंग्लंड टी-20 मालिकेतील पहिला सामना 7 जून रोजी साउथहॅम्प्टन येथे होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल. एजबॅस्टन कसोटीपूर्वी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीत तो भारतीय संघाचा भाग नव्हता. (IND vs WI 2022 : Virat Kohli)
'वेस्ट इंडिज मालिकेसाठी माझी निवड करू नये'
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजसोबत टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे, मात्र यादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने निवडकर्त्यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात समाविष्ट न करण्याची विनंती केली आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजसोबत एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार असून, वनडे मालिकेत भारतीय संघाची कमान शिखर धवनकडे असेल.
सिलेक्टर टिमसोबत बोलला विराट कोहली!
सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय खेळाडूंची निवड केली जाणार आहे, मात्र याचदरम्यान विराट कोहलीबाबत एक मोठी गोष्ट समोर येत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत विराट कोहली भारतीय संघाचा भाग असेल, असे मानले जात होते, मात्र समोर येत असलेल्या माहितीनुसार, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने या मालिकेत खेळण्याची इच्छा नसल्याचे निवडकर्त्यांना (BCCI) सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.