ICC ODI Rankings: विराट अन् रोहित टॉप-10 मध्ये कायम, बुमराह सातव्या स्थानावर !

आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत (ICC ODI Rankings) विराट कोहली आणि रोहित शर्मा टॉप-10 मध्ये कायम आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट दुसऱ्या तर रोहित तिसऱ्या स्थानावर आहे.
Virat Kohli & Rohit Sharma
Virat Kohli & Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा टॉप-10 मध्ये कायम आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट दुसऱ्या तर रोहित तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह गोलंदाजांमध्ये सातव्या तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नवव्या स्थानावर आहे. रोहित (Rohit Sharma) आणि जडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) वनडे मालिकेत टीम इंडियाचा (Team India) भाग नव्हते. या दोघांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. भारताच्या कोणत्याही खेळाडूने या मालिकेत चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे आयसीसी (ICC) क्रमवारीत कोणत्याही खेळाडूला फायदा झालेला नाही. (Virat Kohli And Rohit Sharma Remain In The Top10 In The ICC ODI Rankings Released By The ICC)

दरम्यान, भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धुवांधार कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आयसीसी क्रमवारीत चांगला फायदा झाला आहे. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी फलंदाजांच्या टॉप-10 क्रमवारीत प्रवेश केला आहे. 2019 च्या विश्वचषकानंतर प्रथमच डी कॉकने पहिल्या पाच फलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, डुसेनने कारकिर्दीत प्रथमच टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे.

Virat Kohli & Rohit Sharma
ICC T20 Rankings: शेफाली वर्मा पुन्हा नंबर वन, ऑस्ट्रेलियन खेळाडूला टाकले मागे

चार स्थानांचा डीकॉकला झाला फायदा

डी कॉकने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 229 धावा केल्या. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार 129 धावा केल्या आणि आयसीसी क्रमवारीत चार स्थानांचा फायदा झाला. 218 धावा करणाऱ्या डुसेनने 10 स्थानांची प्रगती करत करिअरमधील सर्वोत्तम 10 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. कर्णधार टेंबा बावुमानेही 80 व्या स्थानावरुन कारकिर्दीतील सर्वोत्तम 59 व्या स्थानावर झेप घेतली.

धवन 15 व्या स्थानावर पोहोचला

भारताकडून सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक 169 धावा केल्या. धवन फलंदाजांच्या क्रमवारीत 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. दुसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतला पाच स्थानांचा फायदा झाला असून तो 82 व्या स्थानावर आहे. या यादीत बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. अफगाणिस्तानचा फलंदाज रहमत शाहने नेदरलँड्सविरुद्ध एकूण 153 धावा केल्या. त्याला सात स्थानांचा फायदा झाला असून तो 36 व्या स्थानावर आहे, तर हशमतुल्ला शाहिदीला नऊ स्थानांचा फायदा झाला असून तो 53 व्या स्थानावर आहे.

Virat Kohli & Rohit Sharma
ICC चा वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू ठरला जो रुट !

दरम्यान, नेदरलँड्ससाठी, स्कॉट एडवर्ड्सने 208 धावा केल्या आणि 97 स्थानांनी 100 व्या स्थानावर पोहोचला. श्रीलंकेचा चरित अस्लंका 52 व्या स्थानावरुन कारकिर्दीतील सर्वोत्तम 46 व्या स्थानावर पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनाही फायदा

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनाही खूप फायदा झाला आहे. मालिकेत पाच विकेट घेणारा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी पुन्हा टॉप-20 मध्ये परतला आहे. तर फिरकी गोलंदाज केशव महाराज कारकिर्दीतील सर्वोत्तम 33 व्या स्थानावर आहे. अँडिले फेहलुकवायो मालिकेत सहा विकेट्स घेत सात स्थानांनी वर 52 व्या स्थानावर आहे.

जेसन रॉय आणि ब्रेडन किंग यांना टी-20 मध्ये फायदा

ICC T20 फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय एका स्थानाने 15व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने 45 धावा केल्या. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा ब्रँडन किंग त्याच्या नाबाद 52 धावांमुळे 28 स्थानांनी 88 व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत जेसन होल्डर कारकिर्दीतील सर्वोत्तम 26 व्या स्थानावर आहे. त्याचा सहकारी गोलंदाज अकिल हुसेनने या मालिकेत किफायतशीर गोलंदाजी केली आणि तो 40 व्या स्थानावरुन 33 व्या स्थानावर पोहोचला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com