ICC चा वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू ठरला जो रुट !

पुरस्काराच्या शर्यतीमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट, न्यूझीलंडचा काईल जेम्सन, श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि भारताचा रविचंद्रन अश्विन यांचा समावेश होता.
Joe Root
Joe RootDainik Gomantak

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2021 चा सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू जाहीर केला. या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट, न्यूझीलंडचा काईल जेम्सन, श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि भारताचा रविचंद्रन अश्विन यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू 2021 (Icc) सालातील पुरस्कारासाठी या खेळाडूंमधून जो रूटची निवड केली. रूटने 2021 साली कसोटीत अप्रतिम कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी कसोटीत रुटने 15 सामन्यात 1708 धावा केल्या आणि सहा शतक केली आहेत.

Joe Root
स्मृति मांधनाचा जलवा, ICC ने Women’s Cricketer Of The Year म्हणून केली निवड

गेल्या वर्षी कसोटीत 1700 हून अधिक धावा करणारा रूट (Joe Root) हा इतिहासातील फक्त तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्या पेक्षा जास्त धावा फक्त दोन खेळाडूंच्या आहे. त्यात पाकिस्तान (Pakistan)चा क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ आणि वेस्ट इण्डीज़ चा क्रिकेटपटू सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा समावेश आहे. आयसीसीने गाले येथे श्रीलंकेविरुद्ध (Sri lanka) आणि भारताविरुद्ध चेन्नई आणि लॉर्ड्स येथे केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन केले. भारत विरुद्ध चेन्नई येथे झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रूटने 218 धावा केल्या.

क्रिकेटपटू आणि फलंदाज म्हणून जो रूटसाठी 2021 हे वर्ष खूप चांगले होते, परंतु कर्णधार म्हणून त्याला सलग पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम भारताने येथे इंग्लंडचा पराभव केला. यानंतर न्यूझीलंड (New Zealand) संघाने इंग्लंडचा त्यांच्याच भूमीवर पराभव केला. यानंतर भारताने (India) पुन्हा इंग्लंडला पराभूत केले. पाच सामन्यांच्या ऍशेस मालिकेतील चार सामन्यांत इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऍशेस मालिकेतील एकमेव सामना हा संघ सांभाळू शकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com