IPL 2026: कोणालाच जमलं नाही ते 'किंग कोहली'ने करून दाखवलं! 'IPL'मध्ये रचला इतिहास, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

Virat Kohli 800 IPL Fours Record: आयपीएल २०२६ च्या हंगामात गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत कोहलीने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
Virat Kohli 800 IPL Fours Record
Virat Kohli 800 IPL Fours RecordDainik Gomantak
Published on
Updated on

बंगळुरू: क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा विराट कोहली बॅट घेऊन उतरतो, तेव्हा विक्रमांची पुस्तके पुन्हा लिहिली जातात. आयपीएल २०२६ च्या हंगामात गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीत कोहलीने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात ८०० चौकार मारणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे क्रिकेट विश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चौकारांचा बादशहा: शिखर धवनला टाकले मागे

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आता सर्वात शिखरावर पोहोचला आहे. त्याने २७४ सामन्यांमध्ये ८०३ चौकारांचा टप्पा गाठला आहे. यापूर्वी हा मान 'गब्बर' शिखर धवनच्या नावे होता, ज्याने ७६८ चौकार ठोकले आहेत. या शर्यतीत डेव्हिड वॉर्नर (६६३) आणि रोहित शर्मा (६५३) हे देखील मागे पडले आहेत. मैदानाच्या चहूबाजूला फटके मारण्याच्या विराटच्या शैलीने त्याला या विक्रमी टप्प्यावर पोहोचवले आहे.

Virat Kohli 800 IPL Fours Record
Goa Fishing Industry: मच्छीमारी व्यवसाय संकटात! परप्रांतीय ट्रॉलर्सचा धुडगूस सुरूच; कारवाईत हवे सातत्‍य

सिक्सर किंगच्या यादीतही एन्ट्री: ३०० षटकारांचा टप्पा पूर्ण

केवळ चौकारच नाही, तर षटकारांच्या बाबतीतही विराटने नवा मैलाचा दगड गाठला आहे. गुजरातविरुद्धच्या खेळीत त्याने एक षटकार खेचताच आयपीएलमधील आपल्या ३०० षटकारांची नोंद केली. ख्रिस गेल (३५७) आणि रोहित शर्मा (३१०) यांच्यानंतर ३०० षटकारांचा आकडा गाठणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यामुळे कोहली केवळ तंत्रशुद्ध फलंदाज नसून एक स्फोटक फलंदाज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Virat Kohli 800 IPL Fours Record
Goa Malaria Cases: मलेरियावर यशस्वी मात! गेल्या 9 वर्षात एकाचाही मृत्यू नाही, दरमहा सरासरी 93 रुग्ण तरीही नियंत्रण कायम!

सातत्य आणि एकाच टीमसाठी निष्ठा

विराट कोहलीच्या या विक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व धावा, चौकार आणि षटकार त्याने केवळ एकाच फ्रेंचायझीसाठी म्हणजेच 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू'साठी खेळताना केले आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते आजपर्यंत एकाच संघाशी एकनिष्ठ राहून इतके मोठे विक्रम प्रस्थापित करणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याच्या या सातत्यामुळेच आरसीबीच्या चाहत्यांमध्ये त्याचे स्थान अढळ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com