Global Plastic Convention In Goa: गोव्यात जागतिक प्लास्टीक परिषदेचा शुभारंभ; 250 उद्योगसमूहांचा सहभाग

भारतातून सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या प्लास्टीकची निर्यात होते.
Global Plastic Convention In Goa
Global Plastic Convention In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) आणि अखिल भारतीय प्लास्टीक निर्माता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गोव्यात जागतिक प्लास्टीक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतीय प्लास्टीक उद्योगाला पाच ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स अर्थव्यवस्थेत संधी’ अशी या परिषदेची थीम आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज (बुधवार, दि.16) या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन केले. 250 हून अधिक उद्योगसमूहांनी या परिषदेत सहभाग नोंदवला आहे.

(Global MSME Convention for Plastic Industry in Goa)

Global Plastic Convention In Goa
Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

केंद्रीय मंत्री नारायण राणे (MSME Minister Narayan Rane) यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेला संबोधित केले. याप्रसंगी बोलताना नारायण राणे म्हणाले, "प्लास्टीक उद्योग अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. सध्या 50,000 उद्योग प्लास्टीक क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील बहुतांश उद्योग सुक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराचे आहेत. या उद्योगांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत 3.5 लाख कोटी रुपयांचे योगदान आहे तसेच 50,000 हून अधिक लोकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. भारतातून सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या प्लास्टीकची निर्यात होते."

"देशातील प्लास्टीकपैकी सुमारे 60 टक्के प्लास्टीकचा पुनःवापर केला जातो, हा दर विकसित देशांतील दरापेक्षा अधिक आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’, ‘स्कील इंडिया’, ‘स्वच्छ भारत मोहीम’, ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांच्या माध्यमातून प्लास्टीक उत्पादनात वाढ होत आहे. 2027 पर्यंत प्लास्टीक उद्योगाची 10 लाख कोटी वार्षिक उलाढाल होणे अपेक्षित आहे. तसेच निर्यात वाढून दोन लाख टन होईल. प्लास्टीक उद्योगाच्या माध्यमातून आगामी पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील," असे नारायण राणे म्हणाले.

Global Plastic Convention In Goa
Goa News: वर्ना, मार्गो आणि बोग्मालो; नावांची लावली पुरती वाट

प्लास्टीक उद्योगासाठी गोवा सरकार सर्वतोपरी मदत करेल असे परिषदेला संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) म्हणाले. दोन दिवसीय परिषदेत शासकीय ई-मार्केट प्लेसच्या माध्यमातून प्लास्टीक उद्योगाला संधी, प्लास्टीक उद्योगाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या योजना, भारतीय टूलिंग क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मंथन केले जाणार आहे. तसेच, तंत्रज्ञान प्रदर्शन, उद्योगप्रतिनिधींच्या बैठका, केस स्टडीज, बेस्ट प्रॅक्टिसेस आणि विविध विषयावर पॅनल चर्चा परिषदेत होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com