Indian Arrested In Nepal: नेपाळ निवडणुकीपूर्वी एका भारतीयाला अटक, कारण आहे धक्कादायक

नेपाळसाठी आगामी निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत.
Arrest
ArrestDainik Gomantak

Indian Arrested In Nepal: भारतीय सीमेला लागून असलेला भारताचा महत्वाचा शेजारी नेपाळमध्ये येत्या काही दिवसात निवडणुका होणार आहेत. नेपाळमध्ये 20 नोव्हेंबर रोजी फेडरल संसद आणि प्रांतीय विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीपूर्वी एक मोठी घटना नेपाळमधून समोर आली आहे.

(Ahead Of Nepal Elections, Indian Held With 15,000 Fake Ballot Papers, Arrested)

Arrest
Global Plastic Convention In Goa: गोव्यात जागतिक प्लास्टीक परिषदेचा शुभारंभ; 250 उद्योगसमूहांचा सहभाग

नेपाळ पोलिसांनी एक भारतीय इसमाला अटक केली आहे. इजाजत अहमद (वय 40, रा. बिहार, भारत) असे या इसमाचे नाव असून, त्याला नेपाळच्या परसा जिल्ह्यातील जगन्नाथपूर नगरपालिकेच्या परिसरातून अटक केली आहे. इजाजत अहमदने सुमारे 15,000 बनावट मतपत्रिका बाळगल्याचा आरोप नेपाळ पोलिसांनी केला आहे. अहमद दुचाकीवरून या मतपत्रिका घेऊन नेपाळ जात होता. निवडणुकीपूर्वी अहमद जवळ बनवाट मतपत्रिका मिळाल्याने त्याला तात्काळ अटक केल्याचे नेपाळ पोलिसांनी म्हटले आहे.

Arrest
Ajay Devgan Surprise In Iffi: इफ्फीत अजय देवगणचे चाहत्यांसाठी खास गिफ्ट, स्वत: राहणार उपस्थित

अहमद वापरत असलेली दुचाकी भारतीय पासिंग असलेली होती. अहमद घेऊन जात असलेल्या बनावट मतपत्रिका कोणासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून घेऊन जात होता. याबाबत नेपाळ पोलीस तपास करीत आहेत. नेपाळसाठी आगामी निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत. देशातील शांतता आणि लोकाशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुका या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नेपाळ प्रशासन सध्या खबरदारी घेत आहे. दरम्यान, नेपाळ पोलिसांनी इजाजत अहमद याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com