Video: 1 धावा वर कोहली आउट, पण त्याच्या 'विराट' अंदाजाने जिंकली चाहत्यांची मने

टीम इंडियाचे 4 नियमित खेळाडू विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या T20 मध्ये प्लेइंग-इलेव्हनमध्ये माघारी परतले.
Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाने (Team India) गेल्या आठवड्यात एजबॅस्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा बदला घेतला आहे असं म्हणायला म्हणायला हरकत नाही. याच मैदानावर झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 49 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या विजयासह भारताने 3 टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. याआधी रोझ बाउलमध्ये देखील भारताने पहिल्या टी20 मध्ये इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत दोन्ही सामने जिंकले होते. (Video virat Kohli out on 1 run but his special prediction won the hearts of the fans)

Virat Kohli
आंतरराष्ट्रीय T20 मधून अ‍ॅरॉन फिंच घेणार निवृत्ती

टीम इंडियाचे 4 नियमित खेळाडू विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या T20 मध्ये प्लेइंग-इलेव्हनमध्ये माघारी परतले. यापैकी बुमराह, पंत आणि जडेजाने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. पण, विराट डाव खेळताना पुन्हा एकदा मुकला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कोहलीने अवघ्या 1 धावा केल्या आणि रिचर्ड ग्लीसनच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यामुळे एजबॅस्टनवर कोहलीची मोठी खेळी पाहण्यासाठी आलेल्या भारतीय चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे. मात्र, क्षेत्ररक्षणादरम्यान कोहलीने चाहत्यांची निराशा दूर करून टाकली.

सामन्यादरम्यान विराट सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. जेव्हा-जेव्हा त्याला संधी मिळत होती, तेव्हा तो भारतीय चाहत्यांशी संवाद साधत होता. यादरम्यान चाहत्यांनी भांगडा केल्यावर कोहलीनेही मैदानात डान्स करायला सुरुवात केली आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहलीचा मैदानावर डान्स करतानाचा व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. असे अनेक प्रसंग आहेत जेव्हा विराटने आपला हा अनोखा अंदाज देखील चाहत्यांना दाखवला आहे.

Virat Kohli
कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथने केला खास विक्रम, असे करणारा ठरला चौथा क्रिकेटर

भारताने इंग्लंडचा 49 धावांनी केला पराभव

एजबॅस्टन येथील दुसऱ्या टी-20 बद्दल बोलायचे झाले तर रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) 46 धावांच्या खेळीमुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 170 धावा केल्या होत्या. इंग्लिश फलंदाज भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीपुढे (3/15) टिकू शकले नाहीत आणि संपूर्ण इंग्लिश संघाने 17 ओव्हरमध्ये 121 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने 35 आणि डेव्हिड विलीने 33 धावा केल्या, तर भारताकडून युजवेंद्र चहलनेही सामन्यादरम्यान 2 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com