कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथने केला खास विक्रम, असे करणारा ठरला चौथा क्रिकेटर

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गाले येथे खेळवला जात आहे.
Steve Smith
Steve Smith Dainik Gomantak
Published on
Updated on

Steve Smith Record Sri Lanka vs Australia, 2nd Test Galle: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गाले येथे खेळवला जात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 364 धावा केल्या होत्या. यादरम्यान स्टीव्ह स्मिथने संघासाठी शानदार कामगिरी केली. त्याने 145 धावांची नाबाद खेळी खेळली. स्मिथच्या खेळीत 16 चौकारांचा समावेश होता. या चौकारांच्या मदतीने त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी सामन्यात 900 किंवा त्याहून अधिक चौकार मारणारा तो चौथा सक्रिय खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, स्मिथने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 272 चेंडूत नाबाद 145 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 16 चौकार मारले. एकूण विक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास तर स्मिथने 153 कसोटी डावात 900 चौकार मारले आहेत. यादरम्यान त्याने एकूण 8161 धावा केल्या. स्मिथची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 239 धावा आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 28 शतके आणि 36 अर्धशतके केली आहेत.

Steve Smith
IPL 2021: स्मिथ, वॉशिंगटन, गिल आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत

तसेच, कसोटी सामन्यात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या सक्रिय खेळाडूंची यादी पाहिल्यास जो रुट अव्वल आहे. त्याने 224 कसोटी डावात 1163 चौकार मारले आहेत. तर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 175 कसोटी डावात 922 चौकार मारले आहेत. विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) बोलायचे झाल्यास, त्याने 173 कसोटी डावात 910 चौकार मारले आहेत.

Steve Smith
''स्टीव्ह स्मिथची दिल्ली कॅपिटल्स संघाला गरज नव्हती''

कसोटी क्रिकेटमध्ये 900 किंवा त्याहून अधिक चौकार मारणारे सक्रिय खेळाडू -

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com