VIDEO: 10 चौकार 3 षटकार... खतरनाक ईशान किशन! पाकड्यांना धु धु धुतलं, तुफान फटकेबाजी व्हिडिओ पाहा

Ishan Kishan: आयसीसी टी-20 विश्वचषकातील क्रिकेटप्रेमींच्या उत्कंठावर्धक भारत विरुद्ध पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना सध्या रंगतदार टप्प्यावर आहे.
Ishan Kishan
Ishan KishanDainik Gomantak
Published on
Updated on

आयसीसी टी-20 विश्वचषकातील क्रिकेटप्रेमींच्या उत्कंठावर्धक भारत विरुद्ध पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना सध्या रंगतदार टप्प्यावर आहे. या सामन्यात भारताकडून सलामीवीर ईशान किशन याने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर अक्षरशः कहर केला आहे. आक्रमक फलंदाजीचा अप्रतिम नमुना सादर करत ईशानने शानदार फलंदाजी केली असून, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय ईशान किशनच्या तुफानी फलंदाजीसमोर फोल ठरल्याचे चित्र दिसून आले. सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत ईशानने चौकार-षटकारांची बरसात केली. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारतीय संघाने मजबूत धावसंख्या उभारण्यास सुरुवात केली आहे.

Ishan Kishan
Goa Opinion: गोव्यासाठी लढणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने विचारवंत, छोटे व्यापारी, शेतकरी यांचा समावेश होता; गोवा मुक्ती आणि विषमतेचा लढा

इशान किशनने ४० चेंडूत ७७ धावांची शानदार खेळी केली. त्याने १० चौकार आणि तीन षटकार मारले. १९२.५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना इशानने पाकिस्तानच्या फलंदाजांना हुलकावणी दिली. त्याने आपल्या फलंदाजीने मोठा प्रभाव पाडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com