6 Sixes In Over: आणखी एका भारतीय फलंदाजाने एका षटकात ठोकले 6 षटकार; युवराज सिंगच्या खास क्लबमध्ये सामील

Indian Batsman 6 Sixes in Over: क्रिकेट जगतात एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम अप्रतिम आहे. असा पराक्रम सारखा-सारखा पाहायला मिळत नाही.
Indian Batsman 6 Sixes in Over Cricket Record
Indian Batsman 6 Sixes in Over Cricket RecordDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Batsman 6 Sixes in Over:

क्रिकेट जगतात एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम अप्रतिम आहे. असा पराक्रम सारखा-सारखा पाहायला मिळत नाही. भारतासाठी आतापर्यंत फक्त तीन खेळाडूंना अशी कामगिरी करता आली होती. पण आता आंध्र प्रदेशच्या एका फलंदाजाने 6 षटकार ठोकून क्रिकेटच्या इतिहासात आपले नोंदवले आहे. कोणत्याही स्पर्धेत कोणत्याही स्तरावर अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त युवराज सिंगला ही कामगिरी करता आली असून तो एकमेव भारतीय आहे. आता अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूचे नाव वम्शी कृष्णा आहे.

दरम्यान, कर्नल सीके नायडू ट्रॉफीच्या सामन्यात आंध्र प्रदेशच्या वम्शीने ही कामगिरी केली. हा सामना कडप्पा येथे रेल्वेविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात वम्शी कृष्णाने दमनदीप सिंगच्या षटकात सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकले. यासह त्याने 64 चेंडूत 110 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. स्पर्धेचा हा चौथा आणि शेवटचा दिवस होता. यासह वम्शी भारतासाठी अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या विशेष यादीत सामील झाला.

Indian Batsman 6 Sixes in Over Cricket Record
Team India: टी20 वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचा परदेशी दौरा ठरला! 'या' संघाविरुद्ध खेळणार मालिका

दरम्यान, या सामन्यात वम्शी कृष्णाने लेग साइडवर सर्व षटकार मारले. त्याने स्लॉग स्वीपसह पहिला षटकार मारला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने चेंडू लाँग ऑनवर थेट सीमापार पाठवला. तिसऱ्या चेंडूवर कृष्णाने फुल लेन्थ चेंडू उचलला आणि डीप मिडविकेटवर षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर त्याने पुन्हा स्लॉग स्वीप खेळला आणि षटकार मारला. वम्शीने डीप स्क्वेअर लेगवर पाचवा षटकार मारला. शेवटच्या चेंडूवर कृष्णाने सहावा षटकार मारला.

Indian Batsman 6 Sixes in Over Cricket Record
Team India: अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत भारताने पाकिस्तानला टाकले मागे; टीम इंडिया जगातील नंबर 1 संघ

भारतासाठी अशी कामगिरी याआगोदर कोणी केली

रवी शास्त्री यांनी पहिल्यांदा 1985 मध्ये ही कामगिरी केली, मात्र त्यानंतर 22 वर्षे वाट पाहावी लागली. पण शास्त्रींनी हा पराक्रम रणजी ट्रॉफीत केला होता. त्यानंतर 2007 च्या टी-20 विश्वचषकात युवराज सिंगने ही कामगिरी केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला. त्यानंतर 2022 मध्ये ऋतुराज गायकवाडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली. आता कृष्णा असा चौथा फलंदाज ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com