Team India Number 1 Surpassed Pakistan Beats Afghanistan: टीम इंडियाने तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानला दोन सुपर ओव्हरनंतर पराभूत केले आणि मालिका 3-0 ने जिंकली. या विजयासह टीम इंडियाने केवळ मालिकाच जिंकली नाही तर पाकिस्तानलाही झटका दिला आहे. म्हणजेच टीम इंडियाने एका दगडात दोन पक्षी मारले. या विजयासह टीम इंडिया खास लिस्टमध्ये जगातील नंबर 1 संघ बनला आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानचा क्लीन स्वीप केला आणि आंतरराष्ट्रीय टी-20मधला हा 9वा क्लीन स्वीप ठरला.
आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानचे संघ 8-8 क्लीन स्वीपसह T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थानावर होते. या दोन्ही संघांनी T20 द्विपक्षीय मालिकेत 8-8 असा क्लीन स्वीप केला होता. आता टीम इंडिया अफगाणिस्तानचा क्लीन स्वीप करत या बाबतीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाने 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वीची शेवटची मालिकाही विजयाच्या जोरावर संपवली आहे.
2015-16: भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-0 असा पराभव केला
2017-18- भारताने श्रीलंकेचा 3-0 ने पराभव केला
2018-19- भारताने वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला
2019-20- भारताने वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला
2019-20- भारताने न्यूझीलंडचा 5-0 असा पराभव केला
2021-22- भारताने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला
2021-22- भारताने वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला
2021-22- भारताने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला
2024- भारताने अफगाणिस्तानचा 3-0 असा पराभव केला
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.