VIDEO: "अब बस करो भाई!", भारतीय संघाचा 'वंडर बॉय' वैतागला, श्रीलंकेत वैभव सूर्यवंशीनं चाहत्यांना जोडले हात; काय झालं नेमंक?

Vaibhav Sooryavanshi Viral Video Sri Lanka Airport: भारतीय क्रिकेटचा उगवता तारा आणि सध्याच्या घडीला जगातील सर्वात जास्त चर्चेत असलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला.
Vaibhav Sooryavanshi Viral Video Sri Lanka Airport
Vaibhav SooryavanshiDainik Gomantak
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi Viral Video Sri Lanka Airport: भारतीय क्रिकेटचा उगवता तारा आणि सध्याच्या घडीला जगातील सर्वात जास्त चर्चेत असलेला युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. 15 वर्षांच्या या धडाकेबाज खेळाडूला इंडिया 'ए' संघात स्थान मिळाले असून, तो श्रीलंकेत होणाऱ्या आगामी त्रिकोणी मालिकेत खेळण्यासाठी सज्ज झाला. या मालिकेसाठी भारतीय 'ए' संघ नुकताच श्रीलंकेत पोहोचला, परंतु एअरपोर्टवरुन बाहेर पडतानाचा वैभवचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये हा तरुण फलंदाज चांगलाच नाराज आणि वैतागलेला दिसत आहे. श्रीलंकेतील चाहत्यांनी सातत्याने सेल्फी आणि फोटोसाठी लावलेल्या तगाद्यामुळे तो प्रचंड त्रस्त झाला आणि शेवटी त्याने हात जोडून चाहत्यांना दूर राहण्याची विनंती केली.

Vaibhav Sooryavanshi Viral Video Sri Lanka Airport
Vaibhav Sooryavanshi: सामना लॉर्ड्सवर, पण चर्चा भारताच्या वैभवची! युवा खेळाडूच्या धडाकेबाज कामगिरीची होतेय चर्चा Watch Video

भारतीय 'ए' संघ या त्रिकोणी मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाला असून, या मालिकेतील सर्व सामने दांबुला येथे खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ जेव्हा एअरपोर्टवरुन बाहेर पडत होता, तेव्हा साहजिकच सर्वांच्या नजरा आयपीएल (IPL) गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. स्थानिक श्रीलंकन चाहत्यांनी वैभवला पाहताच त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली. सततच्या फोटो क्लिक आणि गर्दीमुळे वैभव कमालीचा निराश झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये तो एका चाहत्याला ‘अब बस करो भाई’ असे म्हणताना स्पष्ट दिसत आहे.

याशिवाय, गर्दीने हैराण झालेल्या वैभवने हात जोडून चाहत्यांना आपल्यापासून दूर राहण्यास सांगितले. प्रवासाच्या थकव्यामुळे आणि कदाचित श्रीलंकेत इतक्या मोठ्या संख्येने आपले चाहते असतील अशी अपेक्षा नसल्यामुळे, वैभव या गर्दीत काहीसा अस्वस्थ आणि त्रस्त झालेला पाहायला मिळाला.

Vaibhav Sooryavanshi Viral Video Sri Lanka Airport
Sachin Tendulkar On Vaibhav Sooryavanshi: 'घाई करू नका...' 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट डेब्युबाबत सचिन तेंडुलकर असं का म्हणाला?

इंडिया 'ए' संघाची ही त्रिकोणी मालिका 9 जूनपासून सुरु होत असून, यात भारतीय संघाचा सामना श्रीलंका 'ए' आणि अफगाणिस्तान 'ए' संघाशी होणार आहे. या संपूर्ण मालिकेत सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर असतील. आयपीएल 2026 चा हंगाम वैभवसाठी अत्यंत धमाकेदार आणि स्वप्नवत ठरला, त्यामुळे आता इंडिया 'ए' च्या जर्सीमध्येही तो अशीच चमकदार कामगिरी करेल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे.

Vaibhav Sooryavanshi Viral Video Sri Lanka Airport
Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

दरम्यान, वैभव सूर्यवंशीला आगामी काळात आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही भारतीय संघात (Team India) संधी मिळाली. त्यामुळे या युवा खेळाडूचा क्रिकेटमधील आलेख आगामी काळात आणखी उंचावणार असल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com