VIDEO: 'सॉरी-सॉरी' म्हणत वैभव सूर्यवंशीचा कल्ला! World Cup जिंकताच भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

Vaibhav Suryavanshi Dance Video: भारतीय युवा संघाने (अंडर-१९) पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला आणि सहाव्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
Vaibhav Suryavanshi Dance Video
Vaibhav Suryavanshi Dance VideoDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय युवा संघाने (अंडर-१९) पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करत विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला आणि सहाव्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः फायनलचा हिरो ठरलेला सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचा मराठमोळा आणि अस्सल देशी अंदाज पाहायला मिळाला. विजयाचा जल्लोष सुरू असताना वैभव मजेशीर स्वरात म्हणाला, "मित्रांनो, पंजाबी गाणी समजत नाहीत, आता भोजपुरी गाणी वाजणार!" त्यानंतर पवन सिंहच्या प्रसिद्ध 'सॉरी सॉरी कहा तारू' या गाण्यावर त्याने असा काही ठेका धरला की टीममधील इतर खेळाडूही स्वतःला रोखू शकले नाहीत. झिम्बाब्वेच्या भूमीवर विश्वविजेता बनल्यानंतरचा हा 'भोजपुरी तडका' चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

Vaibhav Suryavanshi Dance Video
Tirumala Tirupati Goa: ..अखेर ‘तिरुमला-तिरुपती’चे अध्यक्ष गोव्यात! सोसायटीविषयी कागदपत्रे केली सादर; सहकार मंत्र्यांसोबत बैठक

फायनलमध्ये वैभवचे वादळ: १७५ धावांची ऐतिहासिक खेळी 

केवळ डान्समध्येच नाही, तर मैदानावरही वैभवने आपल्या बॅटने इंग्लंडच्या गोलंदाजांना नाचवले. त्याने अवघ्या ८० चेंडूंमध्ये १७५ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने १५ चौकार आणि १५ उत्तुंग षटकार ठोकले.

वैभवच्या या आक्रमक शतकामुळे भारताने ४११ धावांचा डोंगर उभा केला. त्याला कर्णधार आयुष म्हात्रे (५३ धावा) आणि अभिज्ञान कुंडू (४० धावा) यांनी मोलाची साथ दिली. ४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३११ धावांवर गारद झाला.

Vaibhav Suryavanshi Dance Video
Goa Tourists Safety: किनाऱ्यावर महिलांचे गुपचूप फोटो काढणाऱ्यांची आता खैर नाही, गोवा पोलीस ॲक्शन मोडमध्ये; 'फोटोबाज' पर्यटकांविरुद्ध कारवाईचा बडगा

सहाव्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी 

भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता आपले वर्चस्व राखले. साखळी फेरीपासून ते फायनलपर्यंत भारताचा अश्वमेध कोणीही रोखू शकले नाही.

भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये विश्वचषक जिंकला होता. आता २०२६ मध्ये हे सहावे जेतेपद मिळवून टीम इंडियाने अंडर-१९ क्रिकेटमधील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com