IPL In Goa: गोव्यात होणार 'आयपीएल' सामने! वेर्ण्यातील 1919 स्टेडियम होणार क्रिकेट हब; कमलप्रसाद यादवांनी व्यक्त केला मानस

Goa Verna Stadium IPL Matches: या मैदानावर आयपीएल टी-२० सामने आयोजित करण्याचा मानस असल्याची माहिती स्टेडियमचे मालक तसेच चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी दिली.
Goa Verna Stadium IPL Matches
Goa Verna Stadium IPL MatchesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cricket Stadium : येथील १९१९ स्पोर्ट्स क्रिकेट स्टेडियम हे येत्या काळात गोव्याच्या क्रिकेट नकाशावर मोठे केंद्र ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील तीन वर्षांत या मैदानावर इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) टी-२० सामने आयोजित करण्याचा मानस असल्याची माहिती स्टेडियमचे मालक तसेच चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी दिली.

आयपीएलसारख्या भव्य स्पर्धेसाठी २५ ते ३० हजार प्रेक्षक क्षमतेची आवश्यकता असते आणि ती वाढवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या या स्टेडियमवर सुरू असलेल्या ‘वर्ल्ड लेजंड प्रो टी-२० लीग’ मुळे गोव्यात क्रीडाविश्वासोबतच आर्थिक हालचालींनाही चालना मिळाली आहे.

भारतासह विविध देशांतील दिग्गज क्रिकेटपटूंच्या उपस्थितीमुळे स्थानिक व्यवसाय, पर्यटन आणि रोजगार संधींमध्ये वाढ झाल्याचे यादव यांनी सांगितले. भविष्यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक स्पर्धा येथे आयोजित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Goa Verna Stadium IPL Matches
Ranji Trophy: दर्शन - अर्जुन तेंडुलकरची झुंज अपयशी! गोव्याच्या फलंदाजांची शरणागती; केरळ 9 विकेट राखून विजयी

यासोबतच ‘वूमन प्रीमिअर लीग टी-२०’ सामने गोव्यात घेण्यासाठीही हालचाली सुरू करण्यात येणार आहेत. युवा खेळाडूंना घडवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मुलांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आले होते, ज्यामध्ये सुमारे ८० मुलांनी सहभाग घेतला. पुढील सहा महिन्यांत मोफत प्रशिक्षण उपक्रमांसह युवा क्रिकेट अकादमी स्थापन करण्याचे नियोजन आहे.

Goa Verna Stadium IPL Matches
Goa Cricket: गोवा क्रिकेट संघात होणार 'मोठा बदल'! नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; आगामी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

गोवा सरकार आणि गोवा क्रिकेट अकादमीकडून मिळणाऱ्या सहकार्यामुळे हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भविष्यात गोव्याचा स्वतंत्र आयपीएल आणि वूमन प्रीमिअर लीग संघ असावा, हे आपले स्वप्न असून त्यासाठी स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यादव यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com