Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांच्या स्टार भारतीय क्रिकेटरचा पाकिस्तानात 'जलवा'! गुगल ट्रेंड्समध्ये वैभव सूर्यवंशी अव्वल; आफ्रिदीशी होतेय तुलना

Vaibhav Sooryavanshi Pakistan Google Trends: भारतीय क्रिकेटचा नवा तारा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आता केवळ भारतातच नाही, तर शेजारी पाकिस्तानातही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
Vaibhav Sooryavanshi Pakistan Google Trends
Vaibhav SooryavanshiDainik Gomantak
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi Pakistan Google Trends: भारतीय क्रिकेटचा नवा तारा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आता केवळ भारतातच नाही, तर शेजारी पाकिस्तानातही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गुगल ट्रेंड्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन महिन्यांत पाकिस्तानात वैभव सूर्यवंशीबाबतच्या सर्चमध्ये कमालीची वाढ झाली. तिथल्या सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या क्रिकेट विषयांमध्ये या युवा भारतीय खेळाडूचे नाव सातत्याने आघाडीवर दिसत असून, अनेक कीवर्ड्स 'ब्रेकआउट' श्रेणीत पोहोचले आहेत.

पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी केवळ त्याचे नावच सर्च करत नाहीत, तर त्याचे वय, आयपीएल 2026 मध्ये त्याला किती पैसे मिळाले, त्याची उंची आणि त्याची क्रिकेटमधील आकडेवारी जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. वैभवच्या या अफाट लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे मैदानावरील त्याचा आक्रमक आणि बिंधास्त अंदाज. नुकतेच त्याने एका सामन्यात विस्फोटक खेळी खेळून जलद अर्धशतकाचा नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला, ज्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

Vaibhav Sooryavanshi Pakistan Google Trends
Team India: गौतम गंभीरला 'इग्नोर' करत आहेत सीनियर खेळाडू? ड्रेसिंग रूममध्ये धुसफूस, 'BCCI'पर्यंत पोहोचली नाराजी

पाकिस्तानात (Pakistan) वैभव सूर्यवंशीची तुलना तिथल्या दिग्गज खेळाडूंशी केली जात आहे. कमी वयातील सुपरस्टारचा विचार करताना पाकिस्तानात मुश्ताक मोहम्मद यांचे नाव घेतले जाते, ज्यांनी 1959 मध्ये वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी कसोटी पदार्पण केले होते. आज वैभव देखील त्याच वयात आपल्या रेकॉर्ड्समुळे पाकिस्तानात प्रसिद्धीच्या झोतात आहे.

दुसरीकडे, वैभवची आक्रमक फलंदाजी, मोठे शॉट्स मारण्याची क्षमता आणि पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांवर दबाव टाकण्याची त्याची शैली यामुळे पाकिस्तानी चाहत्यांना त्यांच्या युवा शाहिद आफ्रिदीची आठवण येत आहे. पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यानेही वैभवच्या फलंदाजीची तुलना युवा शाहिद आफ्रिदीशी केली.

Vaibhav Sooryavanshi Pakistan Google Trends
Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

भारतात आधीच गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवलेला वैभव आता जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे. गुगल ट्रेंड्सच्या डेटावरुन हे स्पष्ट होते की, खेळ हा सीमांच्या पलिकडे असतो आणि वैभव सूर्यवंशीच्या रुपाने मिळालेल्या या नव्या क्रिकेट प्रतिभेबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सध्या पाकिस्तानात शिगेला पोहोचली. या युवा खेळाडूचा धाडसी खेळ आगामी काळात क्रिकेट जगतावर राज्य करणार, याचेच हे संकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com