National Junior Archery: राष्ट्रीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्राला सांघिक जेतेपद

इंडियन राऊंडमध्ये अनुक्रमे पुरुष, महिला गटात वर्चस्व
National Junior Archery Championship
National Junior Archery ChampionshipDainik Gomantak

पणजी: राष्ट्रीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेतील (National Junior Archery Championship) इंडियन राऊंड प्रकारातील सांघिक गटात उत्तर प्रदेशने पुरुष, तर महाराष्ट्राने महिला गटात विजेतेपद मिळविले. सांघिक स्पर्धा गुरुवारी कांपाल येथील गोवा (Campal, Goa) क्रीडा प्राधिकरण मैदानावर झाली.

ज्युनियर पुरुष गटात अंतिम लढतीत उत्तर प्रदेशने केरळवर 6-0 असा एकतर्फी विजय मिळविला. महिला गटातील अंतिम लढतीतही याच फरकाने महाराष्ट्राने झारखंडला नमविले.

National Junior Archery Championship
Goa Rain Update: गोव्यात 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान हलक्या पावसाची शक्यता

पुरुष गटात छत्तीसगडला ब्राँझपदक मिळाले, त्यांनी तेलंगणला 5-3 फरकाने पराजित केले. महिला गटातील ब्राँझपदक लढत चुरशीची ठरली. हरियानाने उत्तर प्रदेशचे कडवे आव्हान 29-28 असे निसटते परतावून लावले.

मिश्र गटात महाराष्ट्र अव्वल

समृद्धी पवार आणि अनिकेत गावडे यांच्या शानदार कामगिरीमुळे मिश्र सांघिक गटात महाराष्ट्राने अव्वल स्थान राखले. समृद्धीने 40 मीटरमध्ये 660 गुण, तर 30 मीटरमध्ये 720 गुण नोंदविले. अनिकेतने 652 गुणांची नोंद केल्यामुळे महाराष्ट्राला अग्रस्थान मिळाले. झारखंड दुसऱ्या, तर हरियाना तिसऱ्या क्रमांकावर आहे.

National Junior Archery Championship
Abandoned Vehicles in Vasco: बेवारस वाहने भंगारात जमा; मुरगाव नगरपालिकेची कारवाई

मणिपूरच्या अमिरला अग्रस्थान

इंडियन राऊंडच्या वैयक्तिक गटात मणिपूरच्या महंमद अमिर अर्शद खान याने पुरुष गटात 668 गुणांसह अग्रस्थान मिळविले. त्याचा राज्यसहकारी चिंगाखाम बिसॉन सिंग 655 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. झारखंडच्या मोहित कुमार याने 659 गुणांसह दुसरा क्रमांक प्राप्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com