Goa VS Arunachal Pradesh: दुबळ्या 'अरुणाचल'वर 'गोव्या'चा एकतर्फी विजय

25 वर्षांखालील क्रिकेट : एकदिवसीय सामन्यात 155 धावांनी एकतर्फी विजय
Under-25 ODI
Under-25 ODIDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दुबळ्या अरुणाचल प्रदेशला अवघ्या 21 धावांत गुंडाळून गोव्याने 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत 155 धावांनी एकतर्फी विजय मिळविला. सामना सोमवारी हरियानातील लाहली येथील चौधरी बन्सीलाल क्रिकेट स्टेडियमवर झाला.

(Under-25 ODI cricket tournament Goa defeated Arunachal Pradesh)

Under-25 ODI
Suryakumar Yadav: 'जगात केवळ एकच 360 डिग्री प्लेयर', सूर्यकुमार यादवने दिलं उत्तर

वेगवान गोलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर गोव्यालाही मुक्तपणे फलंदाजी करता आली नाही. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 176 धावा केल्या. नंतर गोव्याच्या वेगवान गोलंदाजांनी अननुभवी अरुणाचल प्रदेशला नीचांकी धावसंख्येत गुंडाळले. त्यांचा डाव 20.1 षटकांत संपुष्टात आला. फक्त चैतन्य मिश्रा याने दुहेरी धावसंख्या गाठताना नाबाद 11 धावा केल्या. सहा फलंदाज शून्यावर बाद झाले.

Under-25 ODI
IND vs NZ 3rd T20, Live Streaming: तिसरा T20 सामना केव्हा अन् कुठे होणार; पाहा संपूर्ण Details

गोव्यातर्फे वेगवान गोलंदाज निहाल सुर्लकरने 4, शुभम तारीने 3, तर हेरंब परबने 2 गडी बाद केले. रविवारी उत्तर प्रदेशविरुद्ध याच मैदानावर अरुणाचल प्रदेशने सर्वबाद 58 धावा केल्या होत्या. गोव्याचा हा दोन लढतीतील पहिला विजय ठरला. काल त्यांना झारखंडविरुद्ध नऊ धावांनी हार पत्करावी लागली होती.

संक्षिप्त धावफलक

गोवा : 44.4 षटकांत सर्वबाद 176 (शिवम आमोणकर 4, मंथन खुटकर 0, कश्यप बखले 24, आनंद तेंडुलकर 10, निहाल सुर्लकर 22, योगेश कवठणकर 11, सोहम पानवलकर 32, कीथ पिंटो नाबाद 2९, मनीष काकोडे 2, हेरंब परब 5, शुभम तारी 14, योर्जुम सेरा 4-53, डी. बाग्रा 2-26, लेकी त्सेरिंग 2-27) वि. वि. अरुणाचल प्रदेश : 20.1 षटकांत सर्वबाद 21 (चैतन्य मिश्रा नाबाद 11, शुभम तारी 7-4-6-3, हेरंब परब 7-2-12-2, कीथ पिंटो 2-1-1-0, निहाल सुर्लकर 4.1-2-2-4).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com