WPL 2023 चा 12 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 55 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने अनेक मोठे विक्रम मोडीत काढले.
दरम्यान, डब्ल्यूपीएलमध्ये हरमनप्रीत कौरचे (Harmanpreet Kaur) नेतृत्व मुंबई इंडियन्ससाठी खास ठरले आहे. तिच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने लीगमध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. दरम्यान, हरमनप्रीत कौरने 16 वर्ष जुना विक्रम मोडला. तिने भारताचा महान कर्णधार एमएस धोनीचा विक्रम मोडला आहे.
डब्ल्यूपीएलच्या 12 व्या सामन्यातील विजयानंतर हरमनप्रीत कौरने CSK कर्णधार एमएस धोनीचा विक्रम मोडला. 2008 हे वर्ष आयपीएलचे पहिले सत्र होते.
त्या वर्षी, एमएस धोनी सलग पहिले चार सामने जिंकणारा एकमेव कर्णधार ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली CSK संघाने पहिले चार सामने जिंकले. मात्र, पाचव्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
दुसरीकडे, हरमनप्रीत कौरने डब्ल्यूपीएलच्या पहिल्या मालिकेतील पहिले पाच सामने जिंकून हा विक्रम मोडला. जर आयपीएल आणि डब्ल्यूपीएल एकत्र केले तर तिने 16 वर्षे जुना विक्रम मोडला.
हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू जॉर्ज बेलीच्याही रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. कर्णधार म्हणून पहिल्या IPL किंवा WPL मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आतापर्यंत जॉर्ज बेलीच्या नावावर होता.
त्याने 2014 मध्ये पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते. कर्णधार म्हणून त्याने पहिले पाच सामने जिंकले.
अशा स्थितीत हरमनप्रीत कौरनेही डब्ल्यूपीएलमध्ये कर्णधार म्हणून सलग पाच सामने जिंकले आहेत. तिने पुढचा सामना जिंकला तर जॉर्ज बेलीलाचाही रेकॉर्ड मोडेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.