U19 Asia Cup Semifinal: सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; फायनलमध्ये UAE बांगलादेशशी भिडणार

UAE vs PAK: दुसऱ्या उपांत्य फेरीत यजमान यूएई संघाने पाकिस्तानचा पराभव करुन सर्वांनाच चकित केले.
U19 Asia Cup Semifinal UAE vs PAK
U19 Asia Cup Semifinal UAE vs PAKDainik Gomantak
Published on
Updated on

U19 Asia Cup Semifinal UAE vs PAK: आशिया कपमधील भारतीय संघाचा प्रवास संपला. उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. या पराभवासह भारतीय अंडर-19 संघ आशिया कपमधून बाहेर पडला. दरम्यान, दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान यूएई संघाने पाकिस्तानचा पराभव करुन सर्वांनाच चकित केले. म्हणजेच आता बांगलादेश आणि यूएई रविवारी 17 डिसेंबर रोजी अंतिम फेरीत आमनेसामने येतील. बांगलादेशने उपांत्य फेरीत भारताचा 4 विकेट्स राखून पराभव केला. तर पाकिस्तानला UAE विरुद्ध 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

दरम्यान, पाकिस्तानच्या अंडर-19 संघाचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव ठरला आहे. तर हा पराभव असा होता की, त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. यजमान यूएईसाठी हा मोठा विजय ठरला. विशेष म्हणजे, ही स्पर्धा त्यांच्याच देशात खेळवली जात आहे. आता घरच्या मैदानावर UAE चा संघ अंतिम फेरीत बांगलादेशशी भिडणार आहे. ही त्यांच्यासाठी खूप अभिमानाची बाब असणार आहे. चाहते देखील मोठ्या संख्येने अंतिम सामना पाहण्यासाठी येऊ शकतात.

U19 Asia Cup Semifinal UAE vs PAK
U19 Asia Cup: भारताचा 'राज' चमकला! 13 धावांतच 7 विकेट्स मिळवत मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

दुसरीकडे, उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाचा साखळी टप्प्यात पाकिस्तानकडून पराभव झाला होता. असे असतानाही संघाने दोन विजयांसह उपांत्य फेरी गाठली होती. मात्र इथे संघाची कामगिरी पुन्हा एकदा विशेष राहिली नाही आणि बांगलादेशकडून पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या 188 धावांतच आटोपला. प्रत्युत्तरात बांगलादेशने अवघ्या 42.5 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले आणि अंतिम फेरीत धडक मारली.

U19 Asia Cup Semifinal UAE vs PAK
U19 Asia Cup: टीम इंडियाने नेपाळला दाखवलं आस्मान, 10 विकेट्सने विजयासह सेमीफायनलच्या आशाही कायम

आता अंतिम सामन्यात बांगलादेशला परभूत करण्यावर यूएईचे लक्ष असेल. बांगलादेशने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले. युएई आणि बांगलादेश एकाच गटात होते. बांगलादेशने यूएईचा 61 धावांनी पराभव केला होता. त्या एका सामन्याशिवाय यूएईने सर्व सामने जिंकले होते. ग्रुप स्टेजमध्ये UAE ने श्रीलंकेला पराभूत केले होते आणि आता सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत केले. आता त्याची नजर अंतिम फेरीत बांगलादेशकडून ग्रुप स्टेजमधील पराभवाचा बदला घेण्याकडे असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com