Asian Para Games 2026: भारताच्या गोल्डन गर्लची कमाल! शीतल देवीने अवघ्या काही तासांत जिंकली दोन सुवर्णपदके; एशियन पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Sheetal Devi Two Gold Medals Asian Para Games 2026: एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताच्या युवा आणि स्टार पॅरा आर्चरीपटू शीतल देवीने पुन्हा एकदा आपल्या अफाट कामगिरीच्या बळावर संपूर्ण जगात भारताची मान अभिमानाने उंचावली.
sheetal devi
sheetal deviDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Sheetal Devi Two Gold Medals Asian Para Games 2026: एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताच्या युवा आणि स्टार पॅरा आर्चरीपटू शीतल देवीने पुन्हा एकदा आपल्या अफाट कामगिरीच्या बळावर संपूर्ण जगात भारताची मान अभिमानाने उंचावली. अवघ्या काही तासांच्या अंतरामध्ये दोन सुवर्णपदके जिंकत शीतलने पॅरा आर्चरीच्या इतिहासात आपले नाव सुवर्णक्षरांनी कोरले. या स्पर्धेत यापूर्वीच जागतिक विक्रम नावावर करणाऱ्या शीतलने 720 पैकी तब्बल 704 गुणांची कमाई करत अप्रतिम कामगिरी केली होती.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

पॅरा कंपाऊंड आर्चरीच्या अंतिम फेरीत शीतलने 142 चा स्कोअर करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या चुरशीच्या सामन्यात सिंगापूरच्या अलीम नूर स्याहिदाह हिने 139 गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले आणि तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी शीतलने 149 चा स्कोअर करत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. 20 ऑक्टोबर रोजी तिने नोंदवलेला हा सर्वोत्तम स्कोअर तिचा आतापर्यंतचा सर्वोत्तम व्यक्तिगत विक्रम ठरला.

sheetal devi
Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

या ऐतिहासिक विजयापूर्वी गुरुवारी शीतलने तोमर कुमारसोबत मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये देखील भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. अशा प्रकारे वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात काही तासांच्या अंतराने दोन सुवर्णपदके पटकावत तिने पदक तालिकेत भारताची स्थिती अत्यंत मजबूत केली. याआधी तिने पायलसोबत महिलांच्या दुहेरी प्रकारात रौप्य पदक देखील आपल्या नावावर केले.

sheetal devi
Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये निषाद कुमारचा 'गोल्ड' धमाका; उंच उडीत रेकॉर्ड रचत पटकावले दुसरे सुवर्णपदक!

तोमर कुमारसोबत कंपाऊंड मिक्स्ड टीम फायनलमध्ये खेळताना भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा 151-148 अशा गुणांनी पराभव केला. चालू एशियन पॅरा गेम्सच्या आवृत्तीत भारताला तीरंदाजीमधील हे पहिले सुवर्णपदक मिळाले. शीतलने एकूण तीन पदके जिंकून अभूतपूर्व यश संपादन केले. यात पायल नागसोबत जिंकलेले रौप्य पदक आणि इतर दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे.

sheetal devi
Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

अवघ्या 18 वर्षांच्या या होतकरु खेळाडूने एक-एक करत अनेक मोठे विक्रम मोडित काढले. शीतल आणि तोमर कुमार जोडीने मिक्स्ड टीम राऊंडमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवला. शीतलने तुर्कियेच्या खेळाडूच्या जागतिक विक्रमाची बरोबरी करत 720 पैकी 704 गुणांची कमाई केली. मार्च महिन्यात बँकॉकमध्ये तिने स्वतःचा 698 चा आशियाई विक्रम मोडत एशियन पॅरा गेम्सचा विक्रम 680 वरुन थेट 704 वर नेऊन ठेवला. सध्या जगातील नंबर वन आणि विद्यमान जागतिक चॅम्पियन असणाऱ्या शीतलने पात्रता फेरीत 1402 गुणांची कमाई करुन भारताचाच जुना 1400 गुणांचा जागतिक विक्रम मोडीत काढला.

sheetal devi
Asian Para Games: भारतीय खेळाडूंचा चीनमध्ये झेंडा, नेत्रदिपक कामगिरीसह जिंकली आतापर्यंची सर्वाधिक पदके

कंपाऊंड वैयक्तिक प्रकारच्या डिफेंडिंग चॅम्पियन असलेल्या शीतलने आपल्या मोहिमेची सुरुवात अत्यंत दणक्यात केली. तिने पात्रता फेरीत जागतिक विक्रमाची बरोबरी केलीच, शिवाय पायलसोबतच्या महिला डबल्स पात्रता फेरीत 1379 च्या संयुक्त स्कोअरसह नवीन विक्रम केला. याआधी 2023च्या हांगझोऊ एशियन पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक आणि 2024च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या शीतलने आपल्या जिद्दीच्या बळावर वयाच्या अवघ्या विशीतच क्रीडा जगतात आपले एक वेगळे आणि अजेय स्थान निर्माण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com