Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Suvarna Raj Wins Gold In Discuss Throw Asian Para Games: आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी कायम राखत संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
Suvarna Raj Wins Gold In Discuss Throw Asian Para Games
Suvarna Raj Wins Gold In Discuss Throw Asian Para GamesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Suvarna Raj Wins Gold In Discuss Throw: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी कायम राखत देशाची मान अभिमानाने उंचावली. या स्पर्धेत भारताची स्टार पॅरा खेळाडू सुवर्णा राजने अप्रतिम कामगिरी करत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा केले. महिलांच्या F54 वर्गवारीतील डिस्कस थ्रो स्पर्धेत सुवर्णाने 15.66 मीटर लांब थ्रो करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, भारतीय संघासाठी हे 15 वे सुवर्णपदक ठरले असून, या विजयामुळे भारताने पदक तालिकेत थेट चौथे स्थान पटकावले.

सध्या भारताकडे (India) एकूण 64 पदके झाली असून, यात 22 रौप्य आणि 27 कांस्य पदकांचा समावेश आहे. सुवर्णाने तिच्या या गोल्ड कामगिरीच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या तिच्या मेहनतीची चुणूक दाखवून दिली. तिने आपल्या सहा प्रयत्नांपैकी तब्बल चार वेळा 15 मीटरपेक्षा जास्त अंतर पार केले, ज्यावरुन तिची जबरदस्त तयारी स्पष्ट दिसून येते. या थरारक स्पर्धेत इराणची शहाला हदीदी 15.45 मीटर थ्रोसह दुसऱ्या स्थानी राहिली, तर व्हिएतनामच्या न्गोक थुई गुयेन हिने 14.65 मीटर कामगिरीसह कांस्यपदक पटकावले.

Suvarna Raj Wins Gold In Discuss Throw Asian Para Games
Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये निषाद कुमारचा 'गोल्ड' धमाका; उंच उडीत रेकॉर्ड रचत पटकावले दुसरे सुवर्णपदक!

दुसरीकडे, तिरंदाजीत स्वाती चौधरीनेही चमकदार कामगिरी करत देशाचा मान वाढवला. W1 प्रवर्गात भारतासाठी पहिलेच पदक जिंकून तिने नवा इतिहास रचला. महिलांच्या वैयक्तिक अंतिम फेरीत तिची लढत चीनच्या त्सिन मेंगकान हिच्याशी झाली, जिथे तिला अटीतटीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असले, तरी तिच्या जिद्दीने सर्वांची मने जिंकली. सामन्याच्या सुरुवातीला स्वातीने 4-2 अशी मजबूत आघाडी घेतली होती, ज्यामुळे ती सुवर्णपदक जिंकेल असे वाटत होते.

Suvarna Raj Wins Gold In Discuss Throw Asian Para Games
Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

मात्र, उत्तरार्धात झालेल्या चुरशीच्या लढतीत ती पिछाडीवर पडली आणि तिला 4-6 असा पराभव पत्करावा लागला. याआधी गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरिजमध्येही स्वातीने कांस्यपदक जिंकले होते. जागतिक क्रमवारीत 23व्या स्थानी असलेल्या चिनी खेळाडूविरुद्ध झालेला हा सामना जरी तिने गमावला असला, तरी आशियाई पॅरा गेम्समधील हे पदक तिची ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. भारतीय खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशाने क्रीडा जगतात भारताची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com