Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये निषाद कुमारचा 'गोल्ड' धमाका; उंच उडीत रेकॉर्ड रचत पटकावले दुसरे सुवर्णपदक!

Nishad Kumar Gold Medal Asian Para Games 2026: दोन वेळच्या पॅरालिम्पिक पदक विजेत्या निषाद कुमारने आशियाई पॅरा गेम्स 2026 च्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या हाय जंप (उंच उडी) T47 प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले.
Nishad Kumar Gold Medal Asian Para Games 2026
Nishad Kumar Gold Medal Asian Para Games 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Nishad Kumar Gold Medal Asian Para Games 2026: भारत आणि क्रीडा जगतासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर आली. दोन वेळच्या पॅरालिम्पिक पदक विजेत्या निषाद कुमारने आशियाई पॅरा गेम्स 2026 च्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या हाय जंप (उंच उडी) T47 प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. मिझुहो ॲथलेटिक स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय स्टार ॲथलीट निषादने तब्बल 2.04 मीटर उंच उडी मारत या स्पर्धेतील नवीन विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे, या सुवर्णपदकासह निषादने या स्पर्धेत दुहेरी सुवर्ण कामगिरी केली, कारण आदल्याच दिवशी त्याने पुरुषांच्या लाँग जंप (लांब उडी) T47 प्रकारातही सुवर्णपदकाला गवसणी घातली.

हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) या पराक्रमी खेळाडूने मिझुहो स्टेडियमवर सुरुवातीपासूनच अप्रतिम लय आणि आत्मविश्वास दाखवला. त्याने 1.88 मीटर, 1.94 मीटर आणि 1.98 मीटरचे टप्पे अगदी पहिल्याच प्रयत्नात लीलया पार केले. त्यानंतर 2.02 मीटरची उडी मारुन त्याने आपले सुवर्णपदक निश्चित केले. सुवर्णपदक पक्के झाल्यानंतर निषादने 2.04 मीटरचा नवा विक्रम प्रस्थापित केला. उझबेकिस्तानच्या मोहम्मद अब्दुल्ला तुरसुनजोनोव्हने 1.94 मीटरसह रौप्यपदक मिळवले, तर थायलंडच्या अंगकर्ण चानबूनने 1.75 मीटर कामगिरी करत कांस्यपदकावर नाव कोरले.

Nishad Kumar Gold Medal Asian Para Games 2026
Bill Gates AI Warning: 'एआय'मुळे जाऊ शकतो एक अब्ज लोकांचा जीव! बिल गेट्स यांच्या भूमिकेने टेक जगतात खळबळ; नियम बनवण्याची सरकारकडे मागणी

टोकियो 2020 आणि पॅरिस 2024च्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये उंच उडीत रौप्यपदक जिंकणाऱ्या निषाद कुमारने अवघ्या 24 तासांत हाय जंप आणि लाँग जंप दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आदल्या दिवशी त्याने लाँग जंपमध्ये 7.11 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम उडी मारुन पहिले सुवर्ण जिंकले. ऐची-नागोया येथील या आशियाई पॅरा गेम्समध्ये निषादच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आणि भारतीय ॲथलीट्सच्या शानदार पदकांमुळे भारताचा दबदबा अधिकच वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com