World Cup 2023: बंगळुरूत ट्रेंट बोल्टचा मोठा पराक्रम! मॅकग्रा-मुरलीधरनला टाकलं मागे

Trent Boult: बंगळुरुमध्ये श्रीलंकेविरुद्ध वर्ल्डकप 2023 मधील सामना खेळताना ट्रेंट बोल्टने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Trent Boult
Trent BoultPTI
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, New Zealand vs Sri Lanka, Trent Boult Record:

गुरुवारी (9 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये न्यूझीलंडने बंगळुरूला झालेल्या सामन्यात श्रीलंकेला 5 विकेट्सने पराभूत केले. यामुळे न्यूझीलंडने उपांत्य फेरीत जाण्याची दावेदारी मजबूत केली आहे. न्यूझीलंडच्या या विजयात ट्रेंट बोल्टने महत्त्वाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही मिळाला.

या सामन्यात ट्रेंट बोल्टने 10 षटकात 37 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने श्रीलंकेचे मधली फळी उद्धस्त करण्याची कामगिरी बजावली. त्यामुळे न्यूझीलंडला श्रीलंकेला 171 धावांतच रोखणे सोपे गेले.

Trent Boult
World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्यापासून हिट मॅन एक पाऊल दूर, धोनी-विराटही करु शकले नाहीत 'ही' कामगिरी!

दरम्यान, बोल्टने मोठे विक्रमही केले. त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये 50 विकेट्सचा टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंत बोल्टने 2015, 2019 आणि 2023 वर्ल्डकपमध्ये खेळताना 28 सामन्यांत 52 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो वनडे वर्ल्डकपमध्ये 50 विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा पहिलाच गोलंदाज, तर जगातील सहावा गोलंदाज ठरला आहे.

न्यूझीलंडकडून त्याच्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम टीम साऊदीच्या नावावर आहे. त्याने 21 सामन्यांत 38 विकेट्स घेतल्या आहेत.

  • वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

    • 71 विकेट्स - ग्लेन मॅकग्रा (39 सामने, ऑस्ट्रेलिया)

    • 68 विकेट्स - मुथय्या मुरलीधरन (40 सामने, श्रीलंका)

    • 59 विकेट्स - मिचेल स्टार्क (26 सामने, ऑस्ट्रेलिया)

    • 56 विकेट्स - लसिथ मलिंगा(29 सामने, श्रीलंका)

    • 55 विकेट्स - वसिम अक्रम (38 सामने, पाकिस्तान)

    • 52 विकेट्स - ट्रेंट बोल्ट (28 सामने, न्यूझीलंड)

Trent Boult
World Cup 2023: न्यूझीलंड सेमीफायनलच्या उंबरठ्यात, पण अद्यापही पाकिस्तान अन् अफगाणिस्तानला संधी, वाचा समीकरण

मॅकग्राला टाकले मागे

दरम्यान, बोल्टने 28 डावात वनडे वर्ल्डकपमध्ये 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने ग्लेन मॅकग्रा आणि मुथय्या मुरलीधरनला मागे टाकले आहे. या दोघांनी 30 डावात 50 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर मिचेल स्टार्क असून त्याने 19 सामन्यात 50 विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या क्रमांकावरील लसिथ मलिंगाने 25 सामन्यांत 50 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

600 विकेट्सही पूर्ण

ट्रेंट बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट्सचा टप्पाही पूर्ण केला आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा तिसराच गोलंदाज ठरला आहे. त्याने 246 सामन्यांत 25.66 च्या सरासरीने 601 विकेट्स झाल्या आहेत.

त्याच्या आधी न्यूझीलंडच्या टीम साऊदीने 368 सामन्यांत 732 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच डॅनियल विट्टोरीने 442 सामन्यांत 705 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com