IPL Auction 2023: लिलावात होणार कोट्यावधींची उधळण, पण कोणाकडे किती रक्कम शिल्लक?

आयपीएल लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती रुपये शिल्लक राहिले आहेत, जाणून घ्या.
IPL Auction 2023
IPL Auction 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL Auction 2023: इंडियन प्रीमीयर लीगच्या 16 व्या हंगामाचे बिगूल वाजले असून या हंगामासाठी कोचीमध्ये 23 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरूवात होणार आहे. हा लिलाव छोटा असल्याने एकाच दिवसात पूर्ण होईल.

दरम्यान, या लिलावासाठी 405 खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात 273 भारतीय आणि 132 परदेशी खेळाडू आहेत. यातील केवळ 87 खेळाडूंवर बोली लागू शकते.

तसेच आयपीएल 2023 लिलावासाठी सर्व फ्रँचायझींच्या पर्स रकमेत 5 कोटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 95 कोटी अशी सर्व फ्रँचायझींची पर्स रक्कम आहे. पण यातील बरीच रक्कम कायम केलेल्या खेळाडूंवर खर्च झालेली आहे.

(IPL Auction 2023: Remaining purse amount)

IPL Auction 2023
IPL Auction 2023: गोव्याचे 'हे' 3 खेळाडूही होऊ शकतात मालामाल!

सध्या लिलावासाठी सर्वाधिक रक्कम सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीकडे शिल्लक आहे. त्यांच्याकडे 42.25 कोटी रुपये शिल्लक आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद या लिलावात बरेच व्यस्त राहण्याची शक्यता आहे.तसेच सर्वात कमी रक्कम कोलकाता नाईट रायडर्सकडे शिल्लक आहे. त्यांच्याकडे 7.05 कोटी शिल्लक आहेत.

त्याचबरोबर हैदराबाद संघातच सर्वाधिक खेळाडूंसाठी शिल्लक जागा आहे. त्यांच्या संघात 13 खेळाडूंसाठी जागा आहे. त्यांच्यापाठोपाठ कोलकाता संघात 11 खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे. सर्वात मी जागा दिल्ली कॅपिटल्स संघात आहे. त्यांच्या संघात 5 खेळाडूंची जागा शिल्लक आहे.

दरम्यान, आयपीएल 2023 लिलावात बेन स्टोक्स, सॅम करन, केन विलियम्सन अशी काही मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे.

आयपीएल लिलावासाठी फ्रँचायझींची शिल्लक रक्कम आणि खेळाडूंसाठी शिल्लक जागा -

1. चेन्नई सुपर किंग्स -

शिल्लक रक्कम - 20.45 कोटी, खेळाडूंसाठी शिल्लक जागा - 7

2. दिल्ली कॅपिटल्स

शिल्लक रक्कम - 19.45 कोटी, खेळाडूंसाठी शिल्लक जागा - 5

3. गुजरात टायटन्स

शिल्लक रक्कम - 19.25 कोटी, खेळाडूंसाठी शिल्लक जागा - 7

4. कोलकाता नाईट रायडर्स

शिल्लक रक्कम - 7.05 कोटी, खेळाडूंसाठी शिल्लक जागा - 11

5. लखनऊ सुपर जायंट्स

शिल्लक रक्कम - 23.35 कोटी, खेळाडूंसाठी शिल्लक जागा - 10

6. मुंबई इंडियन्स

शिल्लक रक्कम - 20.55, खेळाडूंसाठी शिल्लक जागा - 9

7. पंजाब किंग्स

शिल्लक रक्कम - 32.2, खेळाडूंसाठी शिल्लक जागा - 9

8. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

शिल्लक रक्कम - 8.75, खेळाडूंसाठी शिल्लक जागा - 7

9. राजस्थान रॉयल्स

शिल्लक रक्कम - 13.2, खेळाडूंसाठी शिल्लक जागा - 9

10. सनरायझर्स हैदराबाद

शिल्लक रक्कम - 42.25, खेळाडूंसाठी शिल्लक जागा - 13

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa cabinet approves mining proposal
 JBR Stone Private Limited
Bye-Election Legal Dispute India
Goa IIT
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com