Amit Mishra
Amit MishraDainik Gomantak

IPL Auction 2023: आयपीएल लिलावात सहभागी झालेले 3 वयस्कर खेळाडू, एकाच्या नावावर तीन हॅट्रिक

आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या तीन सर्वात वयस्कर खेळाडूंबद्दल जाणून घ्या
Published on

IPL Auction 2023: इंडियन प्रीमीयर लीग 2023 हंगामाचा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. या लिलावाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरुवात होईल. या लिलावासाठी 991 खेळाडूंनी नावनोंदणी केली होती. पण 405 खेळाडूंचीच लिलावासाठी अंतिम निवड झाली. त्यात काही वयस्कर खेळाडूंचीही नावे आहेत. अशाच या लिलावात सामील असलेल्या 3 सर्वात वयस्कर खेळाडूंवर नजर टाकूया.

Amit Mishra
IPL Auction 2023: गोव्याचे 'हे' 3 खेळाडूही होऊ शकतात मालामाल!

अमित मिश्रा - 40 वर्षे

भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा देखील आयपीएल 2023 लिलावात सामील आहे. तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाजही आहे. त्याने आयपीएलमध्ये 173 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 3 हॅट्रिक घेण्याचाही विक्रम आहे. त्याने नुकतेच सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये हरियाणा संघाचे प्रतिनिधित्वही केले होते. या स्पर्धेत त्याने 8 सामन्यांत 10 विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान 40 वर्षीय अमित मिश्राची आयपीएळ 2023 लिलावासाठी 50 लाख मुळ किंमत आहे.

Amit Mishra
IPL Auction 2023: बापरे! 19 खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी, पण एकही भारतीय नाही! पाहा संपूर्ण लिस्ट

मोहम्मद नबी - 37 वर्षे

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद नबीलाही आयपीएलमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. तो आयपीएलचा करार करणारा पहिला अफगाणी खेळाडूही आहे.

त्याने आत्तापर्यंत 17 आयपीएल सामने खेळले असून 180 धावा केल्या आहेत आणि 13 विकेट्स घेतल्या आहेत. आता तो देखील आयपीएल 2023 लिलावाच्या मैदानात उतरला असून त्याची 1 कोटी मुळ किंमत आहे.

डेव्हिड विसे - 37 वर्षे

दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा आणि नंतर नामिबियाकडून क्रिकेट खेळलेल्या डेव्हिड विसेनेही आयपीएल 2023 लिलावात भाग घेतला आहे. त्याने सर्वात आधी 2015 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून आयपीएल खेळले होते.

त्याने आयपीएलमध्ये 15 सामने खेळले असून 127 धावा केल्या आहेत आणि 16 विकेट्स घेतल्या आहेत. तो सध्या 37 वर्षांचा असून या लिलावासाठी त्याची 1 कोटी मुळ किंमत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com