Australia ODI Captain
Australia ODI CaptainDainik Gomantak

Australia ODI Captain: 'हा' नवा खेळाडू घेणार ऑस्ट्रेलियन कर्णधारची जागा

Australia ODI Captain: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आरोन फिंचने काही दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे.
Published on

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आरोन फिंचने (Aaron Finch) काही दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केले आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार? याची क्रिकेटविश्वात चर्चा रंगली होती. याचदरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटी कर्णधार पॅट कमिन्सची (Pat Cummins) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे. पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा 27वा कर्णधार असेल, जो भारतात 2023 मध्ये रंगणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.

  • पॅट कमिन्सची मोठी प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळताच पॅट कमिन्स म्हणाला, फिंचच्या नेतृत्वाखाली मी क्रिकेट पुरेसा आनंद लुटला आहे. तसेच त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमच्या एकदिवसीय संघात भरपूर अनुभव आणि प्रतिभा आहे.

Australia ODI Captain
GFA Election : जीएफए अध्यक्षपदासह उपाध्यक्षपदासाठी चुरस

पॅट कमिन्सनं 43 कसोटी, 68 एकदिवसीय आणि 42 टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रतिनिधित्व केल आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 199 विकेट्सची नोंद आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 112 विकेट्स घतेल्या आहे. याशिवाय, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला 49 विकेट्स मिळवल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com