WTC 2023 Final Video: बोलंडचा विराटच्या कमजोरीवर वार अन् स्मिथचा शानदार कॅच, जडेजाही शुन्यावर बाद

कसोटी चॅम्पियनशीप फायनलच्या अखेरच्या दिवशी बोलंडने भारताला एकाच षटकात दोन धक्के दिले.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli and Ravindra Jadeja Wicket in WTC 2023 Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात असून अखेरच्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची संधी आहे. दरम्यान, अखेरच्या दिवशी सुरुवातीलाच भारताला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडने एकाच षटकात दुहेरी धक्के दिले.

या सामन्यात अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 41 षटके आणि 3 बाद 164 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यावेळी विराटने 44 धावांपासून आणि रहाणेने 20 धावांपासून खेळायला सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या दिवशीही चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला.

मात्र 47 व्या षटकात विराटची लय बिघडवण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळाले. या षटकात बोलंड गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने झेलबादसाठी रिव्ह्यू घेतला. पण त्यावेळी चेंडू विराटच्या बॅटला लागलेला दिसला नाही.त्यामुळे त्याला नाबाद करार देण्यात आला.

Virat Kohli
WTC 2023 Final रोमांचक वळणावर! भारत - ऑस्ट्रेलियासाठी पाचवा दिवस ठरणार 'करो वा मरो'

मात्र, यानंतर विराटची कमजोरी असलेल्या ठिकाणी बोलंडने तिसरा चेंडू टाकत त्याला चूक करण्यास भाग पाडले. बोलंडने जवळपास चौथ्या-पाचव्या स्टंपवर (बाहेरच्या बाजूला) चेंडू टाकला. ज्यावर विराटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बॅटला लागून उडालेला चेंडू स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथने अप्रतिमरित्या झेलला.

त्यामुळे विराटला 78 चेंडूत 49 धावांवर बाद होत माघारी परतावे लागले. याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बोलंडने रविंद्र जडेजाचाही अडथळा दूर केला. त्याने टाकलेल्या चेंडू जडेजाच्या बॅटला घासून यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरीकडे गेला.

त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला. हे दोघे बाद झाले, तेव्हा 47 षटकात भारतीय संघाने 5 बाद 147 धावा केल्या होत्या.

Virat Kohli
WTC Final: 'थर्ड अंपायरचा निर्णय...', वादग्रस्त कॅचबद्दलच्या पोस्टनंतर BCCI उपाध्यक्षांचा गिलला अप्रत्यक्ष टोला

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 469 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक 174 चेंडूत 163 धावांची खेळी केली. तसेच स्टीव स्मिथने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. तसेच भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 296 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली, तसेच शार्दुल ठाकूरने 51 धावा केल्या. याशिवाय रविंद्र जडेजाने 48 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स कॅरीने सर्वाधिक नाबाद 66 धावांची खेळी केली. तसेच मार्नस लॅब्युशेन आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी ४१ धावा केल्या. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. हा डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावातील 173 धावांच्या आघाडीमुळे भारतासमोर 444 धावांचे आव्हान ठेवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com