These cricketers along with Joginder Sharma, Quinton de Kock and Stuart Broad retired from international cricket in 2023:
2023 हे वर्ष शेवटच्या टप्प्यात आहे. डिसेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला असून, एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभव विसरून भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची तयारी सुरू केली आहे.
भारतीय संघासाठी हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले होते. तथापि, 2020 मध्ये निवृत्त झालेल्या महेंद्रसिंग धोनीची भारताला अद्याप उणीव भासत आहे.
दरम्यान, 2023 मध्येही अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला. काहींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावले तर काहींनी सर्व फॉरमॅटला अलविदा केले.
या यादीत भारताला 2007 चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या जोगिंदर शर्मापासून, 2007 च्या टी20 विश्वचषकात युवराज सिंगकडून सलग 6 षटकार खाणाऱ्या इंग्लंडचा दिग्गज स्टुअर्ट ब्रॉड आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकपर्यंत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.
या वर्षी, दक्षिण आफ्रिकेच्या ड्वेन प्रिटोरियसने सर्वप्रथम निवृत्तीची घोषणा केली. यासह दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू हाशिम आमलाने फ्रँचायझी क्रिकेटसह सर्व फॉरमॅटला अलविदा केला. त्याने आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले होते.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरॉन फिंच, इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि अष्टपैलू मोईन अली यांनीही यावर्षी क्रिकेटला अलविदा केला. मोईन निवृत्तीनंतर केवळ एशेस मालिका खेळण्यासाठी परतला होता.
चेन्नई आयपीएल 2023 मध्ये चॅम्पियन झाल्यानंतर अंबाती रायडूने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. मुरली विजयनेही यावर्षी क्रिकेटचे सर्व प्रकार सोडण्याचा निर्णय घेतला होता.
2007 साली भारतीय संघाने T-20 विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकात फायनलचा हिरो ठरलेला जोगिंदर शर्मा सगळ्यांना आठवतो. जोगिंदर शर्माने 3 फेब्रुवारी 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
हरियाणाच्या रोहतकच्या जोगिंदर शर्माने भारतासाठी 4 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्व T-20 सामने केवळ विश्वचषकात खेळले आणि इतिहास रचला.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने २९ जुलै 2023 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओव्हलवर झालेला एशेस मालिकेतील पाचवी कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.
स्टुअर्ट ब्रॉड, जो 167 कसोटी सामन्यांसह आपल्या कारकिर्दीचा शेवट करणार आहे, तो कसोटी इतिहासात 600 बळी घेणारा देशबांधव जेम्स अँडरसननंतरचा दुसरा वेगवान गोलंदाज आहे.
यापूर्वी 2007 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात कारकिर्दीच्या सुरुवातीलाच युवराज सिंगने त्याच्या एकाच षट्कात सलग 6 षट्कार मारले होते.
भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान अनेक खेळाडूंनी निवृत्तीची घोषणाही केली होती.
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकने या विश्वचषकादरम्यान घोषित केले की तो यापुढे एकदिवसीय सामने खेळणार नाही. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याने हा फॉर्मेट सोडला.
दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आणि इंग्लंडचा डेव्हिड विली यांनीही विश्वचषकादरम्यान निवृत्ती जाहीर केली.
विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांनी निवृत्ती जाहीर केली नसली तरी कदाचित या दोन फलंदाजांनी त्यांचा शेवटचा विश्वचषक खेळला असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.