INDW vs ENGW: टीम इंडियाने शेवट केला गोड! इंग्लंडविरुद्ध मिळवला विजय; सायका-श्रेयंकाची 'कमाल'

INDW vs ENGW: भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका नक्कीच गमावली, परंतु संघाने शेवटच्या टी-20 सामन्यात विजय मिळवून ती संपवली.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

INDW vs ENGW: भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका नक्कीच गमावली, परंतु संघाने शेवटच्या टी-20 सामन्यात विजय मिळवून ती संपवली. पहिले दोन T20 सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने तिसरा सामना 5 विकेटने जिंकला. या सामन्यात साईका इशाक आणि श्रेयंका पाटील यांनी शानदार गोलंदाजी केली. तर फलंदाजी करताना स्टार फलंदाज स्मृती मानधनाने 48 धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 20 षटकात 126 धावा करुन सर्वबाद झाला. इंग्लिश संघाने मालिका आधीच जिंकली होती, त्यामुळे या सामन्यात अनेक आघाडीच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण टीम इंडियाने हे लक्ष्य 19 षटकांत 5 गडी गमावून पूर्ण केले. फलंदाजीत भारताकडून मंधानाने 48 धावा केल्या तर जेमिमाह रॉड्रिग्जने 29 धावांची उपयुक्त खेळी केली. शेवटच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर 6 धावा करुन नाबाद राहिली आणि अमनजोत कौर 10 धावा करुन नाबाद राहिली.

Team India
INDW Vs ENGW: टीम इंडिया हारली! शफाली-रेणुकाची जादू चालली नाही; टी-20 मालिकेत इंग्लंडने नोंदवला पहिला विजय!

दुसरीकडे, शेवटच्या सामन्यात भारतीय महिला गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारतातर्फे युवा श्रेयंका पाटीलने 4 षटकांत केवळ 19 धावा देत तीन बळी घेतले. तर सायका इशाकनेही चमकदार कामगिरी करत 4 षटकात 22 धावा देत तीन बळी घेतले. याशिवाय, अमनजोत कौर आणि रेणुका सिंह ठाकूर यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. पहिल्या दोन सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाने वानखेडेवर विजय मिळवत मालिका संपवली. पण इंग्लंडने ही मालिका 2-1 अशी जिंकली.

Team India
INDW vs ENGW: सेम टू सेम धोनीच! ऋचा घोषचा एकहाती कॅच पाहून फॅन्सला आठवला 'कॅप्टनकूल'; Video

दरम्यान, टी-20 मालिका संपली असून आता भारत आणि इंग्लंडचा महिला संघ एकमेव कसोटी सामन्यात आमनेसामने येणार आहेत. हा सामना 14 ते 17 डिसेंबर दरम्यान नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार आहे. या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ पुढीलप्रमाणे आहे:-

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, ऋचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तितास साद, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com