अफगाणिस्तान क्रिकेट संघाला पाठिंबा देण्याचे तालिबानने दिले आश्वासन

तालिबानच्या (Taliban) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना (Afghanistan Cricket Team) आश्वासन दिले आहे की, ते देशातील क्रिकेटला पूर्ण पाठिंबा देत राहील.
Afghanistan Cricket Team
Afghanistan Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) क्रिकेटविषयी अटकळ आणि भीती कायम आहे. देश तालिबान्यांच्या (Taliban) ताब्यात आल्यानंतर लोकांचे जीवन बदलले आहे, आणि क्रिकेटपटूंची परिस्थितीही सामान्य नागरिकांपेक्षा काही वेगळी नाही. पाकिस्तानसोबत अफगाणिस्तान क्रिकेट (Afghanistan Cricket Team) संघाच्या एकदिवसीय मालिकेबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता आलेली नाही. परंतु आता तालिबानकडून कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हस्तक्षेप करण्यात येणार नसल्याचे विधान करण्यात आले आहे. तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना आश्वासन दिले आहे की, ते देशातील क्रिकेटला पूर्ण पाठिंबा देत राहील.

अफगाणिस्तानच्या वेबसाईट एरियाना न्यूजच्या अहवालानुसार, तालिबानचा नेता अनस हक्कानीने अलीकडेच अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अधिकारी असदुल्ला आणि नूर अली झाद्रान यांची भेट घेतली. यादरम्यान, हक्कानीने म्हटले की, 1996 ते 2001 या काळात त्यांच्या कारकिर्दीत देशात क्रिकेट सुरु झाले होते आणि भविष्यातही ते या खेळासाठी देशाला पाठिंबा देत राहतील.

Afghanistan Cricket Team
Talibanच्या दहशतीखाली पाकिस्तान क्रिकेट बोर्ड; पीसीबी प्रमुखांनी दिलं स्पष्टीकरण

खेळाडूंच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार

हक्कानी म्हणाले की, तालिबान देशाचा क्रिकेट संघ आणि खेळाडूंच्या समस्या सोडवणार आहे. या दरम्यान खेळाडूंनी हक्कानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आशा व्यक्त केली की, तालिबान देशात क्रिकेटला पाठिंबा देत राहील. गेल्या आठवड्यात तालिबान लढाऊंनी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या काबूलमधील कार्यालयात प्रवेश केल्याच्या बातम्या आणि छायाचित्रे समोर आली होती, ज्यात काही क्रिकेटपटूही त्यांच्यासोबत दिसत होते.

Afghanistan Cricket Team
तालिबान्यांनी अफगाण क्रिकेट बोर्डाचा घेतला ताबा

पाकिस्तानसोबत मालिका

अफगाणिस्तानला पुढील महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. याचे आयोजन अफगाणिस्तानला करायचे होते, परंतु गेल्या एका महिन्यात देशातील परिस्थितीमध्ये झपाट्याने झालेल्या बदलामुळे ही मालिका आयोजित करण्यासाठी श्रीलंकेची निवड करण्यात आली. मात्र, तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर तेथून उड्डाणांवर बंदी घातली आहे. यामुळे अफगाणिस्तान संघाच्या श्रीलंकेत आगमनाबाबत संभ्रमाची परिस्थिती आहे. हे पाहता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मालिकेसाठी संघाची निवड पुढे ढकलली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com