Talibanच्या दहशतीखाली पाकिस्तान क्रिकेट बोर्ड; पीसीबी प्रमुखांनी दिलं स्पष्टीकरण

न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंडचा संघ पाकिस्तानचा दौऱ्यावर येणार आहेत.
Ehsan Mani
Ehsan ManiDainikGomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबानच्या राजकिय आक्रमणामुळे (Taliban) संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेटवरही तालिबानच्या दतहशतीची गडद छाया पडली आहे. (Pakistan Cricket) न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ पाकिस्तानचा दौऱ्यावर येणार आहेत. परंतु पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर जागतिक समीकरणे बदलताना दिसत आहेत. या दोन्ही संघांचा पाकिस्तान दौरा धोक्यात आला आहे. जेव्हा न्यूझीलंडच्या काही क्रिकेटपटूंनी या दौऱ्याबद्दल संकोच व्यक्त केला, तेव्हा त्यांचे सुरक्षा तज्ञ रेग डॉईश (Reg Deutsche) यांनी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तान गाठले. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख एहसान मणी (Ehsan Mani) यांनी न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन्ही देश पाकिस्तानला भेट देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

एहसान मणी यांनी शुक्रवारी माध्यमाशी बोलताना सांगितले की, "पाकिस्तानमध्ये क्रिकेट होत आहे. न्यूझीलंडचा संघ सप्टेंबरमध्ये तर इंग्लंडचा संघ ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानला भेट देईल. या देशांना होस्ट करण्यात पाकिस्तानला कोणतीही अडचण नाही."

Ehsan Mani
तालिबान्यांनी अफगाण क्रिकेट बोर्डाचा घेतला ताबा

न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा

या दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघ 11 सप्टेंबरला पाकिस्तानला पोहोचणार आहे. हा दौरा 3 एकदिवसीय आणि 5 टी -20 सामन्यांचा असेल. हे सर्व सामने 3 ऑक्टोबरपर्यंत रावळपिंडी आणि लाहोरमध्ये खेळले जातील. न्यूझीलंडचा हा दौरा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकाच्या तयारीसाठी या दोन्ही संघांना आणि पाकिस्तान क्रिकेट संघाला मदत मिळणार आहे. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येण्याची गेल्या 19 वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. त्यांनी 2002 मध्ये शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर कराचीत खेळला जाणारा कसोटी सामना तेथे झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे रद्द करावा लागला.

Ehsan Mani
Afghanistan फुटबॉल संघाचा खेळाडू झाकी अनवारी याचा विमानातून पडून मृत्यू

न्यूझीलंडनंतर इंग्लंड पाकिस्तानात येईल

न्यूझीलंड दौऱ्यानंतर पाकिस्तान इंग्लंडचे यजमानपद भूषवेल. इंग्लंडचा पुरुष आणि महिला दोन्ही संघ पाकिस्तानमध्ये व्हाईट बॉल मालिका खेळण्यासाठी येतील. या दौऱ्यावर, पुरुष संघ 2 सामन्यांची टी 20 मालिका खेळेल. 2005 नंतर इंग्लंडचा हा पहिला पाकिस्तान दौरा असेल. असेही वृत्त आहे की पाकिस्तान 2023-31 दरम्यान 2 विश्वचषक होस्ट करण्यासाठी बोली लावणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com