तालिबान्यांनी अफगाण क्रिकेट बोर्डाचा घेतला ताबा

बंडखोरांसोबत अफगाणिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल्लाह मजारही (Abdullah Mazar) होता.
Taliban
TalibanDainik Gomanatak
Published on
Updated on

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानची राजधानी काबूल (Kabul) शहरावर ताबा मिळवल्यानंतर गुरुवारी 19 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्यालय (Cricket Board Headquarters) ताब्यात घेतले आहे. बंडखोरांसोबत माजी अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू अब्दुल्लाह मजारही (Abdullah Mazar) होता. अहवालांनुसार, आगामी टी -20 वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या तयारी दरम्यानच मोठा धक्का बसला आहे. तालिबानने देशातील जवळपास देशातील सर्व क्रिकेट स्टेडियमवर ताबा मिळवला आहे.

'अफगाण खेळाडू आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित आहेत'

सोमवारी, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी (Hamid Shinwari) यांनी सांगितले की युद्धग्रस्त देशामध्ये क्रिकेट खेळाळला त्रास होणार नाही कारण तालिबानला क्रिकेट आवडते आणि ते समर्थनही करतात. अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. स्टार अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू, राशिद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी (Mohammed Nabi) सध्या हंड्रेड स्पर्धेत खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहेत. उल्लेख केलेले खेळाडू वगळता, अफगाणिस्तान राष्ट्रीय संघाचे सर्व खेळाडू काबूलमध्ये सुरक्षित आहेत, असे शिनवारी म्हणाले.

Taliban
Afghan स्वातंत्र्य दिनीच तालिबान्यांनी नागरिकांवर केला अमानुष गोळीबार

याआधी रशीद खान यानेही तालिबानच्या ताब्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. अमेरिकेने आपले सैन्य बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी जागतिक नेत्यांना आपल्या देशाला मदत करण्याचे आवाहन केले होते. मोहम्मद नबीनेही ट्विट केले की, अफगाणिस्तानची सद्यस्थिती पाहून आम्ही चिंतेत आहे. "मी जगातील नेत्यांना आवाहन करतो; कृपया अफगाणिस्तानमध्ये अराजकता माजवू देऊ नका. आम्हाला तुमच्या समर्थनाची गरज आहे. आम्हाला शांतता हवी आहे," असही तो यावेळी म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com