India vs Pakistan Ticket Price: कट्टर प्रतिस्पर्ध्यांची अमेरिकेतही जादू, भारत-पाक सामन्याचे तिकिट 1.86 कोटींना

ICC T20 World Cup 2024: सुपर बाउल 58 च्या सामन्यांच्या तिकिटांना दुय्यम बाजारात जास्तीत जास्त $9,000 मिळू शकतात, तर NBA फायनलसाठी कोर्टसाइड सीट्सचे सर्वात महागडे तिकिट $24,000 मिळते.
India vs Pakistan
India vs PakistanX/ICC

Ticket Price For India vs Pakistan Match In ICC T20 World Cup 2024:

ICC T20 World Cup 2024 साठी तिकीट विक्रीचा पहिला टप्पा 22 फेब्रुवारी रोजी सुरू झाला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.

अवघ्या 10 दिवसांच्या कालावधीत, या तिकिटांनी रिसेल मार्केटमध्ये प्रवेश केला आहे, जिथे त्यांना मागणी वाढली, विशेषत: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्यामुळे तिकिटांच्या किंमती वाढल्या असून, त्यांनी एनबीए आणि मेजर लीगच्या तिकिटांएवढी पातळी गाठली आहे.

तिकिटांच्या अधिकृत विक्रीमध्ये तिकिटाची सर्वात कमी किंमत सहा डॉलर्स म्हणजे 497 रुपये आहे. त्याच वेळी, या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी प्रीमियम सीटची किंमत 400 डॉलर्स म्हणजेच 33,148 रुपये आहे.

तथापि, StubHub आणि SeatGeek सारख्या प्लॅटफॉर्मवर, तिकिटांच्या किमती खूप जास्त आहेत. अधिकृत विक्रीवर ज्या तिकिटाची किंमत $400 म्हणजेच 33,148 होती, ती पुनर्विक्री साइट्सवर $40,000 इतकी आहे, म्हणजे अंदाजे 33 लाख रुपये आहे. जर यामध्ये प्लॅटफॉर्म फीमध्ये जोडली तर ही किंमत $50,000 पर्यंत पोहोचते म्हणजेच अंदाजे 41 लाख रुपयांपर्यंत जाते.

India vs Pakistan
IPL 2024: कमिन्सवर सनरायझर्स हैदराबादला गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी, विश्वविजेता कर्णधार सांभाळणार नेतृत्वाची धुरा

यूएसए टुडेच्या अहवालानुसार, सुपर बाउल 58 च्या सामन्यांच्या तिकिटांना दुय्यम बाजारात जास्तीत जास्त $9,000 मिळू शकतात, तर NBA फायनलसाठी कोर्टसाइड सीट्सचे सर्वात महागडे तिकिट $24,000 मिळते.

SeatGeek प्लॅटफॉर्मवर, किमती गगनाला भिडल्या आहेत. T20 विश्वचषक 2024 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी या साइटवरील सर्वात महाग तिकिटाची किंमत $175,000 म्हणजेच अंदाजे 1.4 कोटी रुपये आहे. प्लॅटफॉर्म शुल्क आणि अतिरिक्त शुल्क यामध्ये जोडल्यास ही सुमारे 1.86 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते.

India vs Pakistan
IPL 2024: ऋतुराजबरोबर रचिन रविंद्र करणार CSK साठी सलामीला फलंदाजी? धोनीला घ्यावा लागणार मोठा निर्णय

दरम्यान, टी20 विश्वचषकाच 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानसोबत अ गटात ठेवण्यात आले आहे.

या गटात हे दोन मोठे संघ आहेत. याशिवाय आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका यांना या दोन संघांविरुद्धचा सामना जिंकणे कठीण होईल. आगामी T20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे तर पाकिस्तानचे नेतृत्व शाहीन आफ्रिदीकडे असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com