विराट कोहलीने आता क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले आहे. शनिवारी कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देऊन संपूर्ण जगाला चकित केले. याआधी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून (South Africa) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. केपटाऊनमध्ये खेळलेली शेवटची कसोटी ही कोहलीच्या कारकिर्दीतील 99 वी कसोटी होती.
बीसीसीआयने कोहलीला फोन केला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहलीच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) धक्का बसला आहे. त्यानंतर त्यांनी कोहलीशी फोनवर चर्चा केली. बीसीसीआयने कोहलीला त्याच्या 100 व्या कसोटीत कर्णधारपदाची ऑफर दिली होती, जी त्याने नाकारली. श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 25 फेब्रुवारीपासून होणारी कसोटी ही विराट कोहलीची (Virat Kohli) 100 वी कसोटी असेल.
"एक सामना काही फरक पडत नाही"
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयकडून ऑफर मिळाल्यावर कोहली म्हणाला - 'एका मॅचने काही फरक पडत नाही. मी याबद्दल जास्त विचार करत नाही.' कोहलीने आपल्या कारकिर्दीत अनेकवेळा व्यक्त केले आहे की, 'वैयक्तिक विक्रम आपल्यासाठी काही फरक पाडत नाहीत. मी संघाला यशस्वी करण्यावर विश्वास ठेवतो.' कोहली हा भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 68 पैकी 40 कसोटी जिंकल्या आहेत.
त्याच्या पोस्टमध्ये टीमबद्दलही लिहिले
कर्णधारपद सोडताना कोहलीने संघाचाच उल्लेख केला होता. त्याने लिहिले - टीम इंडियाला योग्य दिशेने नेण्यासाठी मी सात वर्षे कठोर परिश्रम केले आहेत. मी माझे काम प्रामाणिकपणे केले. सर्व गोष्टी एका वेळी येतात आणि थांबतात. माझ्यासाठी कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची हीच योग्य वेळ आहे.
कोहलीने लिहिले- या प्रवासात मला अनेक चांगले आणि वाईट अनुभव आले. पण मी माझे प्रयत्न कधीच सोडले नाहीत. तसेच संघावर विश्वास ठेवणे सोडले नाही. मी नेहमीच मैदानावर 100 टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. माझे मन शुद्ध असून मी माझ्या संघाचे वाईट कधी करु शकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.