सिलेक्टर्संनी दुर्लक्ष केले अन् 'या' फिरकीपटूने दाखवूनच दिले, काउंटी चॅम्पियनशिपमध्ये...

Yuzvendra Chahal: सध्या सुरु असलेल्या आशिया चषक आणि आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून दुर्लक्ष झाल्यानंतर 33 वर्षीय चहलने 29 षटकांत 63 धावा देत तीन बळी घेतले.
Yuzvendra Chahal
Yuzvendra ChahalDainik Gomantak
Published on
Updated on

Team India News: टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू यजुवेंद्र चहलने डिव्हिजन वन सामन्यात नॉटिंगहॅमशायरविरुद्ध तीन विकेट घेत केंटसह त्याच्या काउंटी चॅम्पियनशिप मोहिमेची प्रभावी सुरुवात केली.

सध्या सुरु असलेल्या आशिया चषक आणि आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून दुर्लक्ष झाल्यानंतर 33 वर्षीय चहलने 29 षटकांत 63 धावा देत तीन बळी घेतले.

चहलचा जलवा

दरम्यान, यजुवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) नॉटिंगहॅमशायरचे फलंदाज मॅथ्यू माँटगोमेरी, लिंडन जेम्स आणि केव्हिन हॅरिसन यांना बाद करुन केंटच्या 446 धावांना प्रत्युत्तर देताना डाव 265 धावांत गुंडाळला.

चार दिवसीय सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावाच्या आधारे केंटने 181 धावांची आघाडी घेतली. लेग स्पिनवर चहलने जेम्सला पहिल्यांदा आऊट केले.

याच मोसमात केंटने भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसोबतही करार केला, ज्याने पाच सामन्यांत13 बळी घेतले होते.

Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal: चहलला का डावललं? नक्की कसं आहे भारतीय संघाचं वर्ल्डकपसाठी गणित, जाणून घ्या

सिलेक्टर्संना दाखवून दिले

चहल हा भारताच्या (India) T20 संघाचा नियमित सदस्य आहे, परंतु त्याने या वर्षी जानेवारीपासून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. तो शेवटचा भारतीय संघाकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळला होता.

चहलला केंटसाठी तीन काउंटी सामने खेळण्यासाठी करारबद्ध केले आहे. नॉटिंगहॅमशायर आणि लँकेशायरविरुद्ध घरच्या मैदानावर दोन सामने खेळल्यानंतर तो सॉमरसेटविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे.

Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal: युझी आता IPL मध्ये 'नंबर वन'! चहलने ब्रावोच्या ऐतिहासिक रेकॉर्डची केली बरोबरी

सिलेक्टर्संनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले

सिलेक्टर्संनी चहलकडे दुर्लक्ष केले आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी टीम इंडियाच्या बाहेर ठेवले. भारताचा सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज मानला जाणारा लेग स्पिनर यजुवेंद्र चहल याला विश्वचषक 2023 च्या संघातून वगळण्यात आले आहे.

वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त, 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या गोलंदाजी क्रमवारीत कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com