पिछाडीवरून मुंबईचा जबरदस्त विजय

164 धावांची आघाडी घेऊनही 119 धावांनी गोव्याचा पराभव
Goa Cricket team
Goa Cricket team Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : चिकाटी आणि चिवटपणा यासाठी मुंबईचा क्रिकेट संघ ओळखला जातो. रविवारी रणजी करंडक क्रिकेट (Cricket) सामन्यात या झुंजार संघाने पिछाडीवरून जबरदस्त पुनरागमन साधले आणि 119 धावांची शानदार विजय प्राप्त केला.

पहिल्या डावात 164 धावांची आघाडी घेऊनही गोव्याचा (goa) संघ दुसऱ्या डावातील कचखाऊ फलंदाजीमुळे हरला. मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी गोव्याचा दुसरा डाव 232 धावांच्या आव्हानासमोर 112 धावांत संपुष्टात आला. गोव्याच्या फलंदाजांनी डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानी (5-60), ऑफस्पिनर तनुष कोटियन (3-29) व वेगवान धवल कुलकर्णी (2-12) यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करली. मुलानीने दोन्ही डावात मिळून 11 गडी बाद केले.

Goa Cricket team
LPG सिलेंडरवर सबसिडी पुन्हा सुरू, खात्यात येऊ लागले पैसे

दहाव्या क्रमांकावरील अमूल्य पांड्रेकर (नाबाद 23) व अकराव्या क्रमांकावरील अमित यादव (19) यांनी शेवटच्या विकेटसाठी डावातील सर्वोच्च 32 धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला किमान शतक पार केल्याचे समाधान लाभले. उपाहारास बिनबाद 4 धावा केलेल्या गोव्याचा डाव नंतर 9 बाद 80 धावा असा गडगडला. पहिल्या डावात फक्त 163 धावा केलेल्या मुंबईने (Mumbai) दुसरा डाव रविवारी उपाहारापूर्वी 9 बाद 395 धावांवर घोषित केला.

मुंबई गटात अव्वल स्थानी

मुंबईने गोव्यावरील विजयासह एलिट ड गटात अव्वल स्थान मिळविले आहे. या विजयासह त्यांना सहा गुण मिळाले. सौराष्ट्रविरुद्ध अनिर्णित लढतीतील तीन गुणांसह दोन लढतीनंतर त्यांची एकूण गुणसंख्या नऊ झाली. अन्य एका लढतीत सौराष्ट्रने ओडिशाला डाव व 131 धावांनी हरवून सात गुणांची कमाई केली. दोन लढतीनंतर सौराष्ट्रचे आठ गुण झाले. ओडिशाचे तीन, तर गोव्याचा एक गुण कायम राहिला.

Goa Cricket team
'जलआयोग, वन विभागाने वैधानिक मंजुरी नाकारावी'

पुढील लढत तीन मार्चपासून

एलिट ड गटातील शेवटची फेरी अहमदाबाद येथेच तीन ते सहा मार्च या कालावधीत खेळली जाईल. तेव्हा सौराष्ट्रची लढत गोव्याविरुद्ध होईल, तर मुंबई ओडिशाविरुद्ध खेळेल.

मुंबईच्या विजयाचे शिल्पकार

- शम्स मुलानी याचे सामन्यात 167 धावांत 11 विकेट्स, कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी

- डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाचे पहिल्या डावात 107 धावांत 6, तर दुसऱ्या डावात 60 धावांत 5 विकेट्स

- दुसऱ्या डावात मुलानीच्या 136 चेंडूंत 4 चौकारांसह 50 धावा

- तनुष कोटियन याच्या दुसऱ्या डावात 98 धावा, 163 चेंडूंत 8 चौकार, 1 षटकार

- कोटियन व मुलानी यांची आठव्या विकेटसाठी 116 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी

- नवव्या विकेटसाठी कोटियनची मोहित अवस्थीसह 60 धावांची भागीदारी

- दुसऱ्या डावात ऑफस्पिनर कोटियनचे 29 धावांत 3 बळी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com